नांदेडात पाकिस्तानचा जाळला ध्वज

By admin | Published: April 16, 2017 08:51 PM2017-04-16T20:51:38+5:302017-04-16T20:51:38+5:30

माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत नांदेडात १६ एप्रिल रोजी जोरदार आंदोलन करण्यात आले.

Pakistan's flagged flag at Nanded | नांदेडात पाकिस्तानचा जाळला ध्वज

नांदेडात पाकिस्तानचा जाळला ध्वज

Next

ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 16 - भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावल्याच्या निषेधार्थ माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत नांदेडात १६ एप्रिल रोजी जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानचा ध्वज जाळून घोषणाबाजी करण्यात आली.
कुलभूषण जाधव यांना दिलेली फाशीची शिक्षा रद्द करावी या मागणीसाठी शनिवारपासून नांदेडात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत रविवारपर्यंत हजारो नांदेडकरांनी स्वाक्षरी करीत सहभाग घेतला़ पाकिस्तानने जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या निषेधार्थ रविवारी सकाळी शहरातील वजिराबाद चौकात निदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत हजारो कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेधाच्या घोषणा दिल्या. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणला होता. आंदोलनासाठी सकाळपासून वजिराबाद चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते.
आंदोलनात आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, महापौर शैलजा स्वामी, दिलीप बेटमोगरेकर, विजय येवनकर,अब्दुल शमीम, सुमती व्याहाळकर, मंगला निमकर, अनुजा तेहरा, विलास धबाले, मसूद खान, दिलीप डांगे, साबेर चाऊस, पप्पू पाटील कोंडेकर, अविनाश कदम, संतोष मुळे, विठ्ठल पावडे, सलीम चावलवाला, शेख गौस यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
५६ इंची छाती दाखविण्याची हीच वेळ
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने खोट्या आरोपावरुन निष्पाप कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार विरुद्धच्या महाराष्ट्रातील जनतेच्या संतप्त भावना स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून केंद्र सरकारला कळविणार आहोत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५६ इंची छातीची हिंमत दाखविण्याची आता हीच खरी वेळ असल्याचे आव्हान माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांनी दिले.

Web Title: Pakistan's flagged flag at Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.