पाकिस्तानची साखर मुंबईत, ३० हजार क्विंटलची आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 05:01 AM2018-05-13T05:01:58+5:302018-05-13T05:01:58+5:30

ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याच्या केंद्र

Pakistan's sugar, 30,000 quintals of import in Mumbai | पाकिस्तानची साखर मुंबईत, ३० हजार क्विंटलची आयात

पाकिस्तानची साखर मुंबईत, ३० हजार क्विंटलची आयात

googlenewsNext

राजाराम लोंढे
कोल्हापूर : ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा फायदा उठवित मुंबईतील एका बड्या उद्योग समुहाने ३० हजार क्विंटल साखरेची आयात केली आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानच्या साखरेचे दर स्थानिक साखरेपेक्षा एक रुपयांनी कमी आहेत. कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात चॉकलेटमधील साखरेएवढीच ३० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली आहे. पनवेल आणि वाशी येथील गोदामामध्ये ती ठेवण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशात ३१६ लाख टन यंदा साखरेचे उत्पादन, तर गेल्या वर्षीचे ४० लाख टन साखर शिल्लक आहे. एफआरपीप्रमाणे पैसे देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत. शेतकरी, साखर कारखानदारांच्या रेट्यानंतर केंद्राने निर्यात अनुदानाची घोषणा करीत आयात शुल्क वाढविले. त्यामुळे बाजारातील साखरेचे दर स्थिर होतील, अशी अपेक्षा असतानाच पाकिस्तानची साखर आयात झाली.
सहा महिने ‘रेक’ मोकळीच
कोल्हापुरातून रोज २६०० टन साखर रेक (रेल्वे) मधून पंजाब, पश्चिम बंगाल, गुवाहाटी आदी राज्यांत जात होती; पण गेल्या सहा महिन्यांपासून एकही रेक जाऊ शकलेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

‘पाकची साखर शेतकºयांना उद्ध्वस्त करणारी’
ठाणे : भारतीयांना उद्ध्वस्त करण्यासाठी पाकचा माल आयात करण्याचे नवे धोरण भाजपा सरकारने आखले आहे. ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. ऊस उत्पादक शेतकरी हमीभावासाठी आक्रोश करत असताना, पाकिस्तानातील साखर येथे आणून आमच्या शेतकºयांना उद्ध्वस्त केले जात आहे. पाकची ही साखर आमच्या देशात विकू देणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
राज्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखाने संकटात असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर दाखल झाली आहे. ही साखर येथील बाजारभावापेक्षा एक रुपयाने कमी किमतीची आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा आमदार आव्हाड यांनी दिलेल्या पत्रकात समाचार घेतला.

पाकिस्तानची साखर आयात का केली ?-राजू शेट्टी
पुणे : साखरेचे चांगले उत्पादन झाले आहे. तरी पाकिस्तानमधून मुंबईमध्ये साखर का आणली गेली, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. दिवसेंदिवस साखरेचे दर कमी होत असताना निर्यातीपेक्षा पाकिस्तानमधून आयात करण्यावर भर का दिला जात आहे. त्यावरून शेतकºयांची सरकारला किती काळजी आहे, ते समजतेय, असा टोलाही त्यांनी लगावला. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४४ व्या ज्ञानसत्रात सदाशिवराव पिंगळे स्मृती व्याख्यानात बळीराजाला-दयेची नाही तर न्यायाची गरज आहे, या विषयाची शेट्टी यांनी मांडणी केली.शेट्टी म्हणाले, आपल्या देशात टोमॅटो ५ रुपये किलोने विकला जात होता. तेव्हा पाकिस्तानात २०० रुपये किलो दर होता. तरी त्यांनी शत्रू राष्टÑाकडून टोमॅटो घ्यायचा नाही, अशी भूमिका घेतली होती. आपण मात्र त्यांच्याकडून साखर आयात करत आहोत. शेतकºयांच्या मालाला भाव मिळू नये, असे धोरण राज्यकर्त्यांनी केले आहे. आपली मते पक्की करण्यासाठी शेतकºयांचा बळी देऊन सर्वसामान्यांना खुश ठेवण्यात राज्यकर्ते यशस्वी झाले असल्याचेही शेट्टी म्हणाले.

आयात शुल्कात पळवाट काढून अशा प्रकारे साखर देशात आल्याने साखर उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन आयातीबाबत कडक पावले उचलली नाही तर हा उद्योग उद्ध्वस्त होईलच, पण शेतकरीही देशोधडीला लागेल.
- पी. जी. मेढे, तज्ज्ञ,साखर उद्योग, कोल्हापूर

Web Title: Pakistan's sugar, 30,000 quintals of import in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.