Palghar Bypolls 2018: पालघरमध्ये खासगी वाहनातून ईव्हीएम मशिन्सची वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 12:28 PM2018-05-29T12:28:03+5:302018-05-29T12:28:03+5:30
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम खासगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पालघर- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचं मतदान सोमवारी (ता. 28 मे) पार पडलं. मतदानानंतर ईव्हीएम मशिन्स एका खासगी वाहनातून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम खासगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पालघरच्या चिंचरे गावातील 17 नंबरच्या मतदान केंद्रावरील या ईव्हीएम होत्या. किराट गावातील काही नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी निवडणूक झोन अधिकारी दीपक खोत आणि मनोहर खांदे यांना नागरिकांनी गाडी अडवून जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. दरम्यान, याप्रकरणात अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. चिंचरेमधील बूथ क्र.1मधील मतपेट्या खासगी वाहन क्रमांक एम एच 03 बीएस 0980 मधून नेल्या जात होत्या.
दरम्यान, सोमवारी मतदानावेळी अनेक ईव्हीएम बंद पडल्याने, निवडणूक प्रक्रियेवर विरोधकांनी टीका करत प्रश्न उपस्थित केले होते.