महाराष्ट्रात व्हावे पाली विद्यापीठ

By admin | Published: November 1, 2016 05:28 AM2016-11-01T05:28:24+5:302016-11-01T05:28:24+5:30

महाराष्ट्रात पाली विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी पाली प्राध्यापक परिषदेतर्फे करण्यात आली

Pali Vidyapeeth should be in Maharashtra | महाराष्ट्रात व्हावे पाली विद्यापीठ

महाराष्ट्रात व्हावे पाली विद्यापीठ

Next


नागपूर : महाराष्ट्रात पाली विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी पाली प्राध्यापक परिषदेतर्फे करण्यात आली असून या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळातर्फे सादर करण्यात आले आहे.
पाली भाषा ही भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. प्राचीन भारतीय जीवनाची सर्व अंगे त्यामध्ये अभ्यासता येतात. त्या भाषेचा अभ्यास महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणात होत आहे.
या सर्वांचा विचार करता महराष्ट्रात पाली विद्यापीठ स्थापन व्हावे, अशी मागणी लावून धरण्यात आली असून संघर्ष सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करतांना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारत पाली विद्यापीठ निर्मितीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात आ. जोगेंद्र कवाडे, पाली प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. बालचंद्र खांडेकर, डॉ. मालती साखरे, अ‍ॅड. शैलेश नारनवरे, डॉ. नीरज बोधी, डॉ. नीलिमा चव्हाण आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Pali Vidyapeeth should be in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.