पालखी सोहळा पुण्यनगरीत दाखल

By admin | Published: June 19, 2017 01:41 AM2017-06-19T01:41:06+5:302017-06-19T01:41:06+5:30

टाळ मृदुंगाचा गजर... माऊलीच्या नामाचा जयघोष...पंढरीच्या दिशेने पडणारी पाऊले. आकाशी फडकणाऱ्या पताका...दर्शनासाठी उसळलेला लाखोंचा जनसागर..

Palkhi Ceremony filed in Pune | पालखी सोहळा पुण्यनगरीत दाखल

पालखी सोहळा पुण्यनगरीत दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : टाळ मृदुंगाचा गजर... माऊलीच्या नामाचा जयघोष...पंढरीच्या दिशेने पडणारी पाऊले. आकाशी फडकणाऱ्या पताका...दर्शनासाठी उसळलेला लाखोंचा जनसागर... अशा मंगलमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी पुण्यनगरीत आगमन झाले. पुणेकरांनी भक्तीभावाने पालख्यांचे स्वागत केले.
संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिरात तर संत तुकारामांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात रात्री मुक्कामी पोचली. महापौर मुक्ता टिळक व उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दोन्ही पालख्यांचे पुण्यनगरीत स्वागत केले. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर या पालख्या मंगळवारी सकाळी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील.
२६ हजार गॅस सिलिंडर
आषाढी वारी सोहळ््यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांना जिल्हा प्रशासनातर्फे तब्बल २६ हजार गॅस सिलिंडर आणि ९३ हजार लिटर रॉकेलचा पुरवठा करण्यात येणार आहे. हा गॅस पुरवठा करण्यासाठी आळंदी, देहू ते पंढरपूर असे १४ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार म्हणाले की, पालखी सोहळ््यात ३४५ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. वारकऱ्यांना अन्न तयार करण्यासाठी इंधनाची व्यवस्था असते.

Web Title: Palkhi Ceremony filed in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.