उद्योगनगचा पाहुचार घेऊन पालखी पुण्याकडे

By admin | Published: June 29, 2016 11:31 AM2016-06-29T11:31:00+5:302016-06-29T15:48:32+5:30

पिंपरी-चिंचवडकराचा पाहुणाचार घेऊन टाळ-मृदंगाचा जयघोष आणि हरिनामाचा गजर करीत संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखीसोहळा बुधवारी सकाळी पुण्याकडे मार्गस्थ झाला

Palkhi Pune, by taking an industrialist's hospitality | उद्योगनगचा पाहुचार घेऊन पालखी पुण्याकडे

उद्योगनगचा पाहुचार घेऊन पालखी पुण्याकडे

Next

ऑनलाइन लोकमत

पिंपरी, दि. २९ -  पिंपरी-चवडकराचा पाहुणाचार घेऊन टाळ-मृदंगाचा जयघोष आणि हरिनामाचा गजर करीत संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखीसोहळा बुधवारी सकाळी पुण्याकडे मार्गस्थ झाला. गेल्या दोन दिवसापासून  आल्हाददायक वातावरण आहे. विठूनामाचा गजर अखंडपणे सुरु आहे. आकुर्डीतील मुक्काम करून सकाळी सातलाला सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी पहाटे सहाला महापूजा झाली. या वेळी देवस्थानाचे अध्यक्ष शांताराम मोरे, सोहळाप्रमुख सुनील मोरे, अशोक नि. मोरे, अशोक मोरे आदी उपस्थित होत्या. 
महापूजेनंतर  त्यानंतर आकुर्डीकराचा निरोप घेऊन वैष्णव वारीची वाट चालू लागले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अधून-मधून हलक्याशा पावसाच्या सरी बसरत होत्या.   वारकºयांच्या स्वागतासाठी कक्ष उभारलेले होते.  सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन,  पिंपरी एचए कॉलनीतील विठ्ठल मंदिरात पहिला विसावा झाला. कामगार नगरीने वारकर्यांची मनोभावे सेवा केली. त्यानंतर दापोडीत दुपारचा विसावा होणार असून, बोपोडी, खडकी, वाकडेवाडीमार्गे सोहळा पुण्यात आज सायंकाळी मुक्कामासाठी थांबणार आहे.
 
वारीत अवतरले हनुमान....
 
 
 
 
 

ईश्वर सेवा ही सुद्धा एक देशसेवाच याचा प्रत्यय देणारे लष्करी अधिकारी.. बॉम्बे सॅपर्स च्या जवान वारकऱ्यांना पाणी देताना..

 

 

Web Title: Palkhi Pune, by taking an industrialist's hospitality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.