भरपावसातही पालखीसोहळ्याला गर्दी
By admin | Published: July 3, 2016 01:46 AM2016-07-03T01:46:53+5:302016-07-03T01:46:53+5:30
सोपानकाकांच्या सासवड नगरीत आलेली माऊलींची पालखी संगे पाऊस घेऊन आल्याने शनिवारी वारीसोहळ््यात ‘‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे‘‘, अशी परिस्थिती होती.
सासवड (जि. पुणे) : सोपानकाकांच्या सासवड नगरीत आलेली माऊलींची पालखी संगे पाऊस घेऊन आल्याने शनिवारी वारीसोहळ््यात ‘‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे‘‘, अशी परिस्थिती होती. पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या वारकऱ्यांनी नाचत, गात, या अनंदसरींचे स्वागत केले. तर भरपावसातही दर्शनासाठी सासवडवासीयांनी गर्दी केली होती.
प्रथेप्रमाणे सासवड नगरपालिकेच्या वतीने पहाटे नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांची पूजा करण्यात आली. दिवसभर पावसाच्या रिमझिम सरीत आबालवृद्धांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला. संत ज्ञानदेवाचे बंधू संत सोपानकाकांच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान झाले. या सोहळ्यासाठी दोन्ही पालख्यांमधील वारकरी एकत्र आल्याने त्या माध्यमातून बंधूभेटच घडून आली. विविध खेळणी, गृहपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी लहान मुले व महिलांनी गर्दी केली होती. (वार्ताहर)