पल्लवीचा मारेकरी दोषी!
By admin | Published: July 1, 2014 02:33 AM2014-07-01T02:33:44+5:302014-07-01T02:33:44+5:30
अॅड़ पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने सोमवारी आरोपी साजीद अहमद मुघलला दोषी धरल़े येत्या गुरुवारी साजीदला कोणती शिक्षा द्यावी,
Next
>मुंबई : अॅड़ पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने सोमवारी आरोपी साजीद अहमद मुघलला दोषी धरल़े येत्या गुरुवारी साजीदला कोणती शिक्षा द्यावी, याबाबत सरकारी पक्ष युक्तिवाद करेल़ त्यावर बचाव पक्ष आपले म्हणणो सादर करेल व त्यानंतर न्यायालय साजीदला शिक्षा ठोठावेल़
खून, विनयभंग व घुसखोरी या गुन्ह्यांसाठी सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी साजीदला दोषी धरल़े याची माहितीही साजीदला न्यायालयात देण्यात आली़ त्या वेळी साजीदने केवळ मान हलवून यास प्रत्युत्तर दिल़े यासाठी सरकारी पक्षाने 4क् तर बचाव पक्षाने 3 साक्षीदार तपासल़े ते ग्राह्य धरीत न्यायालयाने साजीदला दोषी धरल़े आता साजीदला फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी अॅड़ पल्लवीच्या कुटुंबीयांनी केली आह़े त्यामुळे न्यायालय साजीदला काय शिक्षा ठोठावणार, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आह़े
अॅड़ पल्लवीवर साजीदची पहिल्यापासून वाईट नजर होती़ त्या रात्री ती घरात एकटीच होती़ त्या वेळी साजीदने जाणीवपूर्वक लाइट बंद केल्या व घरात घुसला़ त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला़ पण तिने प्रतिकार केल्याने साजीदने तिचा खून केला, असा पोलिसांचा आरोप आह़े
च्त्या वेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या साजीदला अवघ्या काही तासांतच पोलिसांनी मुंबई सेंट्रल स्थानकातून अटक केली़ त्याच्यावर खून, घुसखोरी व विनयभंगाचे सुमारे 4क्क् पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आल़े
च्ही हत्या 9 ऑगस्ट 2क्12 रोजी झाली़ वडाळा येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील घरात अॅड़ पल्लवीचा मृत्यदेह पहाटेच्या सुमारास आढळून आला़ या घरात ती तिचा प्रियकर अविक सेनगुप्तासोबत राहत होती़ अविकनेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली़