बांगलादेशी घुसखोरांकडे पॅन कार्ड, आधार कार्ड
By Admin | Published: March 14, 2017 07:33 AM2017-03-14T07:33:41+5:302017-03-14T07:33:41+5:30
भारतात पारपत्र कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या रासेल शेख (२८) याच्यासह आठ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने ठाणे
ठाणे : भारतात पारपत्र कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या रासेल शेख (२८) याच्यासह आठ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने ठाणे आणि पनवेलमधून अटक केली आहे. त्यांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडे भारतीय पॅन कार्ड आणि आधार कार्ड आढळल्याने त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ठाण्याच्या कोपरी भागात रासेल शेख हा बांगलादेशी वास्तव्य करीत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने १२ मार्च रोजी कोपरीमध्ये कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. तो मूळचा बांगलादेशी असून, त्याच्याकडे भारतात वास्तव्याची कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. त्याच्याकडील सखोल चौकशीत त्याचे आणखी नातेवाईक रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील कोपरा गाव येथे वास्तव्याला असल्याचे त्याने सांगितले. (प्रतिनिधी)