पणजी महापालिका भाजपाच्या हातातून निसटली

By admin | Published: March 8, 2016 01:14 PM2016-03-08T13:14:17+5:302016-03-08T13:14:17+5:30

राजधानी पणजीची महापालिका भाजपाच्या हातातून निसटली आणि महापालिकेवर आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या गटाने 17 जागा मिळवून निर्विवाद यशाचा झेंडा फडकावला

Panaji municipality escaped from BJP's hands | पणजी महापालिका भाजपाच्या हातातून निसटली

पणजी महापालिका भाजपाच्या हातातून निसटली

Next
>ऑनलाइन लोकमत - 
पणजी, दि. ८ - पणजी महापालिकेची सत्ता भाजपाच्या हातातून निसटली आहे. देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासाठी पणजी महापालिका निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची होती कारण हा सगळा भाग पणजी विधानसभा मतदार संघात येतो. आणि या मतदार संघातून सलग 5 वेळा पर्रिकर निवडून आले होते. मात्र राजधानी पणजीची महापालिका भाजपाच्या हातातून निसटली आणि महापालिकेवर आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या गटाने 17 जागा मिळवून निर्विवाद यशाचा झेंडा फडकावला. 
भाजपाला केवळ 13 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही पण मोन्सेरात हे अलिकडेच काँग्रेसमधून हकालपट्टी केले गेलेले आमदार आहेत. त्यांनी या महापालिका निवडणूकीत काँग्रेस आणि भाजपाचा पराभव केला आहे. एक़ूण 30 प्रभागातून 14 महिला विजयी ठरल्या आहेत. 
 
महापालिका निवडणूक विश्लेषण
 
पणजी : गोवा विधानसभेच्या निवडणूका पुढील केवळ 12 महिन्यात होणार आहेत. अशावेळी गोव्यातील एकमेव अशा राजधानीतील पणजी महापालिका निवडणूकीत भाजपाचा पराभव होणे हा गोव्यात सत्तेवर असलेल्या भाजपासाठी चिंतेचा विषय ठरतो. भाजपाच्या विरोधात असलेले काँग्रेस आणि अन्य सर्व पक्ष यांचा आत्मविश्वास वाढविणारा निकाल महापालिका निवडणूकीत लागला आहे. भाजपा विरोधात विविध लहानमोठे पक्ष एकत्रित येण्याची प्रक्रिया यामुळे सुरु होईल. असे राजकीय अभ्यासकांकडून मानले जाते. 
या महापालिका निवडणूकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, आमदार सिद्धार्थ कुंकळय़ेकर, बाबूश मोन्सेरात, पांडुरंग मडकईकर यांच्यासह तीन पक्षांच्या एकूण सात आमदारांनी भाग घेतला. विधानसभा निवडणूकीची ही सेमी फायनल असल्याप्रमाणो प्रचारकाम केले गेले. स्वत: संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी शेवटच्या टप्प्यात भाजपचे बुडते जहाज सांभाळण्यासाठी पणजीत दोन दिवस तळ ठोकला होता. पणजीतील अनेक प्रतिष्ठीत नागरिकांना त्यांनी फोन करुन भाजपाला मत द्या असे आवाहन केले होते. भाजपा गटाचा जाहिरनामाही पर्रिकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता. महापालिकेवर भाजपाचीच सत्ता येईल असा विश्वास पर्रिकर यांनी व्यक्त केला होता. पणजीचे महापौरपद भाजपाकडे होते. तरीही मतदारांनी आता भाजपला महापालिकेतून सत्तेपासून दूर ठेवले आहे. भाजपामध्ये याविषयी गंभीर चिंतन आता सुरु झाले आहे. काँग्रेसचे बळ वाढले नाही पण बाबूश मोन्सेरात, विश्वजीत राणो, विजय सरदेसाई, रोहन खवटे असे समविचारी आणि धर्मनिरपेक्ष विचारप्रणाली मांडणारे नेते एकत्र येण्याची प्रक्रिया महापालिका निवडणूक निकालाने सुरु केली. महिला शक्तीनेही 30 पैकी 14 जागा जिंकत महापालिकेच्या राजकारणात आपला करिष्मा दाखवला. 
 

Web Title: Panaji municipality escaped from BJP's hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.