जिजाऊंच्या राजवाड्यातून पंचधातूची तोफ चोरीला!

By Admin | Published: December 24, 2014 02:20 AM2014-12-24T02:20:05+5:302014-12-24T02:20:05+5:30

सिंदखेडराजा या राजधानीमधून राजे छत्रपती लखोजीराव जाधव हे सोळाव्या शतकामध्ये राज्यकारभार करीत होते.

Panchagarh mortar stolen from Jijau's palace | जिजाऊंच्या राजवाड्यातून पंचधातूची तोफ चोरीला!

जिजाऊंच्या राजवाड्यातून पंचधातूची तोफ चोरीला!

googlenewsNext

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : राष्ट्रमाता जिजाऊंच्या राजवाड्यामध्ये पुरातत्त्व विभागांतर्गत उभारण्यात आलेल्या शासकीय वस्तुसंग्रहालयामधून सोळाव्या शतकातील पंचधातूंची ८५ किलो वजनाची तोफ चोरीस गेल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला़
सिंदखेडराजा या राजधानीमधून राजे छत्रपती लखोजीराव जाधव हे सोळाव्या शतकामध्ये राज्यकारभार करीत होते. सिंदखेडराजा येथून आडगावराजा, देऊळगावराजा, किनगावराजा व मेहुणाराजा ही प्रत्येकी चारही गावे १३ कि.मी. अंतरावर आहेत. या गावांमध्ये शत्रूने आक्रमण केल्यास संरक्षणार्थ सिंदखेडराजा येथील राजवाड्यातून भुयारी मार्ग असल्याचे पुरावे आहेत. २० वर्षांपूर्वी अडगावराजा येथील गढीचे खोदकाम करताना पंचधातूच्या ८ तोफा सापडल्या होत्या. सर्व तोफा किनगावराजा पोलीस ठाण्याच्या वतीने सिंदखेडराजा येथील राजवाड्यात जमा करण्यात आल्या. त्यापैकी ६ तोफा कमी वजनाच्या असल्यामुळे राजवाड्याच्या वरच्या मजल्यावर ठेवण्यात आल्या आहेत. ८५ किलो वजनाच्या २ तोफा लाकडी गाळ्यावर राजवाड्यामध्ये प्रथमदर्शनी शासकीय वस्तुसंग्रहालयामध्ये पर्यटकांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. तेथे पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी पहारा देतात. २२ डिसेंबर रोजी पुरातत्त्व विभागाचे पहारेकरी रमेश पुंजाजी जाधव हे सुटीवर होते. त्यामुळे शासकीय वस्तुसंग्रहालयाचे कनिष्ठ लिपिक राहुल कारभारी सरकटे यांनी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी राजवाडा बंद करून समोर कुलूप लावले. २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता राजवाडा उघडला, तेव्हा एक तोफ चोरीला गेल्याचे राहुल सरकटे व रमेश जाधव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला कळविले. पोलिसांनी पाहणी केली असता सदर तोफ राजवाड्याच्या मागच्या भागातील पूर्वेकडील कोपऱ्यामधून चोरट्यांनी लंपास केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. राहुल सरकटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास करण्यासाठी बुलडाणा येथील श्वानपथकाला माहिती दिली. परंतु हे पथक उपलब्ध नसल्यामुळे अकोला येथील श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Panchagarh mortar stolen from Jijau's palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.