पंचायत समितीला टाळे !

By admin | Published: January 21, 2017 03:41 AM2017-01-21T03:41:21+5:302017-01-21T03:41:21+5:30

अनागोंदी कारभाराविरोधात संतप्त झालेल्या लाभार्थ्यासहीत श्रमजीवी संघटनेने पंचायत समिती कार्यालयास शुक्रवारी टाळे ठोकले.

Panchayat committee to avoid! | पंचायत समितीला टाळे !

पंचायत समितीला टाळे !

Next

राहुल वाडेकर,

विक्रमगड- तालुक्यातील घरकुल योजनेतील अनागोंदी कारभाराविरोधात संतप्त झालेल्या लाभार्थ्यासहीत श्रमजीवी संघटनेने पंचायत समिती कार्यालयास शुक्रवारी टाळे ठोकले. २६८ पैंकी काही लाभार्थ्यांना शबरी योजनेमध्ये समाविष्ट करुन उर्वरीत लाभार्थ्यांना घरकूल योजनेचे हप्ते टप्प्याटप्प्याने देण्याचे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी डोल्हारे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यास आले असल्याचे संघटनेचे सचिव कैलास तुंबडा यांनी लोकमतला सांगितले़
विक्रमगड तालुक्यामध्ये सन-२०१६-१७ या कालावधीमध्ये २६८ लाभार्थ्याची घरकुल योजनेसाठी निवड करण्यात आली होती. त्यांच्या यादीला मान्यता मिळाल्याने घरकुल लाभार्थ्यांनी स्वत:ची घरे पाडून पाया खोदाई व बांधकामदेखील सुरु केले़ . मात्र पंचायत समितीच्या अनागोंदी कारभारामुळे केवळ १९५ लाभार्थ्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली. तर केवळ ७३ लाभार्थ्यांना आॅनलाईन मान्यता मिळाली. प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणारी रक्कम पंचायत समितीने थांबविली. प्रशासाने २६८ घरकुलपैकी काही लाभार्थ्यांना शबरी योजनेत समाविष्ट करुन उर्वरीतांना घरकुलाचे हप्ते टप्प्याटप्प्याने देण्याचे पत्र गटविकास अधिकारी डोल्हारे यांनी दिले. (वार्ताहर)
।जुने घर पाडले निधीअभावी नवे बांधता येईना
निधी न मिळाल्याने लाभार्थ्यांनंी सुरु केलेल्या घरकुलांची बांधकामे थांबविण्याशिवाय लाभार्थ्यापुढे पर्याय उरला नाही़. प्रशासनाच्या या कारभारामुळे लाभार्थ्यांची आर्थिककोेंडी झाल्याने नवे घरकुल बांधणे शक्य होत नाही आणि जुने घर पाडून टाकल्याने त्यांना ऐन थंडीमध्ये उघड्यावर राहावे लागत होते. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना तत्काळ रक्कम देण्यात यावी यासाठी श्रमजीवीने पुढाकार घेऊन संघटनेचे शिष्टमंडळाचे सचिव कैलास तुंबडा व संघटक रुपेश डोले यांच्या नेतृत्वाखाली विक्रमगड पंचायत समितीला टाळे ठोकण्यात आले़

Web Title: Panchayat committee to avoid!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.