पंचायत समितीत सत्तेसाठी गळ्यात गळा

By admin | Published: March 15, 2017 02:04 AM2017-03-15T02:04:45+5:302017-03-15T02:17:20+5:30

बुलडाणा जिल्ह्यात १३ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली.

In the Panchayat Samiti, the necklace for power | पंचायत समितीत सत्तेसाठी गळ्यात गळा

पंचायत समितीत सत्तेसाठी गळ्यात गळा

Next

बुलडाणा, दि. १४- जिल्ह्यात १३ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये चार पंचायत समितीच्या सभापतीपदी घाटाखाली भाजप तर घाटावर काँग्रेसने परस्पर विरोधी विचारधारेच्या पक्षांना एकत्र करून सत्ता स्थापन करीत वरचष्मा कायम ठेवला आहे.
चिखलीमध्ये अटीतटीची लढत झाली. ऐनवेळी एक सदस्य अनुपस्थित राहिल्याने काँग्रेसचा सदस्य सभापतीपदी विराजमान झाला तर उपसभापतीपद भाजपच्या सदस्याची वर्णी लागली. यावेळी या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मेहकरमध्ये शिवसेनेला तर देऊळगाव राजा पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने शांततेत निवड प्रक्रिया पार पडली. तर लोणारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आली. सिंदखेडराजा तालुक्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी युती केली आहे. सत्तेसाठी सदर पक्ष एकत्र आल्याने राजकीय वतरुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

 

पंचायत समिती नाव.............................................             पद पक्ष
बुलडाणा तस्लीमा बी रसूल सभापती काँग्रेस 
 कविता लहासे उपसभापती भारिप
सिंदखेडराजा राजेश ठोके सभापतीराष्ट्रवादी
 दीपा सुखा जाधव उपसभापती भाजपा
लोणार निर्मला जाधवसभापती  शिवसेना
 अरुणा महाजन उपसभापती राष्ट्रवादी 
देऊळगावराजारजनी चिकटेसभापती राष्ट्रवादी
 हरीश शेटे उपसभापती भाजपा
चिखली संगीता पांढरे सभापती काँग्रेस 
 जितेंद्र कलंत्री उपसभापती भाजपा
मेहकर जया खंदारे सभापती शिवसेना
 राजू घनवट उपसभापती शिवसेना
शेगाव विठ्ठल पाटील सभापती भारिप 
 शालिनी सोनोने उपसभापती भारिप
संग्रामपूर तुळसाबाई भारत  वाघ सभापती भाजपा
 उज्‍जवला नंदकिशोर घायल उपसभापती भाजपा
खामगाव उर्मिला गायकीसभापती  भाजपा
 भगवानसिंग सोळंके उपसभापती भाजपा
नांदुरा अर्चना शिवाजीराव पाटील सभापती काँग्रेस
 सुनीता संतोष डिवरेउपसभापती  शिवसेना
मोताळा पुष्पा उखा चव्हाणसभापती काँग्रेस
 सरस्वती रामदास भोरे उपसभापती शिवसेना
मलकापूर संगीता दादाराव तायडे सभापती भाजपा
 सीमा प्रदीप बगाडेउपसभापती  भाजपा
जळगाव जामोद दीपाबाई बंडल सभापती भाजपा
 रामचंद्र राऊत उपसभापती  भाजपा



 






 




 

Web Title: In the Panchayat Samiti, the necklace for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.