पंचकल्याणक महोत्सवास प्रारंभ
By Admin | Published: February 13, 2016 02:31 AM2016-02-13T02:31:28+5:302016-02-13T02:31:28+5:30
सटाणा तालुक्यातील जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे निर्माण करण्यात आलेल्या भगवान वृषभदेवाच्या १०८ फूट उंचीच्या भव्य मुर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ््याच्या दुसऱ्या
नाशिक : सटाणा तालुक्यातील जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे निर्माण करण्यात आलेल्या भगवान वृषभदेवाच्या १०८ फूट उंचीच्या भव्य मुर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ््याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सर्वोतोभद्र महालात पंचकल्याणक उत्सवास प्रारंभ झाला.
८८ देवतांना आवाहन व त्यांचा सन्मान करण्यासाठी अभिषेक, शांती होम, जलहोम, नित्यपूजा, यागमंडल
व नवग्रह होम आदी विधी
हस्तीनापूर येथील मुख्य
प्रतिष्ठाचार्य विजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व नरेश शास्त्री ,सतेंद्र शास्त्री, प्रदीप शास्त्री, भरत काला, सम्मेध उपाध्य आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या विधीत हजारो जैन भाविक सहभागी झाले.
आचार्य अनेकान्त सागर, गणिनी प्रमुख ज्ञानमती माताजी यांची
प्रवचने झाली. या नेत्रदीपक सोहळ््यात सहभागी होण्याचे भाग्य आपणास लाभले, हे जन्मोजन्मीचे पुण्य असल्याचे मत व्यक्त करीत धार्मिक विधीचे महत्त्व गणिनी प्रमुख ज्ञानमती माताजी यांनी प्रवचनातून सांगितले.
आचार्य अनेकान्त सागर, गणिनी प्रमुख ज्ञानमती माताजी, आचार्य देवनंदी महाराज, आचार्य पद्मनंदी महाराज, आचार्य गुप्त नंदी महाराज, आचार्य बालाचार्य जिनसेन आदींसह शेकडो जैन साधू- महंतांसह आचार्य, मुनी, माताजी, आर्यिका यांचे आगमन झाले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी सकाळी भगवान वृषभदेवांच्या दर्शनासाठी येत आहेत. (प्रतिनिधी)
मांगीतुंगीच्या पवित्र भूमित तीर्थंकर भगवान वृषभ देवांची विशाल मूर्ती साकारण्यात आली आहे. ही मूर्ती सर्वांचे परिश्रम, श्रद्धा व भक्तीचे फळ आहे . मूर्ती निर्माण हा एक चमत्कार असून, त्यामुळे केवळ जैन समुदायाचाच नाही तर भारताचा गौरव संपूर्ण विश्वात वाढला आहे.
- आचार्य अनेकान्त सागर