24 तासांत पंचनामे आणि तीन दिवसांत मदत!
By admin | Published: December 14, 2014 01:05 AM2014-12-14T01:05:41+5:302014-12-14T01:05:41+5:30
गारपीट, वादळ, अतिपाऊस आदी आपत्तीग्रस्तांनादेखील दुष्काळग्रस्तांना मिळणा:या सवलती व मदत मिळेल. तसा आदेश काढला जाईल.
Next
जळगाव : गारपीट, वादळ, अतिपाऊस आदी आपत्तीग्रस्तांनादेखील दुष्काळग्रस्तांना मिळणा:या सवलती व मदत मिळेल. तसा आदेश काढला जाईल. तसेच आपत्तीसंबंधी पंचनामे 24 तासांत करण्याचे स्थायी आदेश असतील. पुढे आपत्ती झाली की प्रशासनाने आदेशांची प्रतीक्षा न करता तातडीने पंचनामे पूर्ण करावेत, असे आदेश दिल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी दिली.
खडसे म्हणाले, आता आपत्ती आल्यानंतर लागलीच पंचनामे व्हावेत. 24 तासांत ही प्रक्रिया पूर्ण व्हावी, कर्मचा:यांनी सुटीच्या दिवशीही पंचनामे करावेत आणि घरांची पडझड, मृत व्यक्ती, आपत्तीमध्ये पशुधन गमाविलेल्या नुकसानग्रस्तांना किमान तीन दिवसांत व कमाल आठवडाभरात मदत मिळावी, असे आदेश दिल्याचेही ते म्हणाले.
दुष्काळी भागासाठी जाहीर झालेल्या आदेशांप्रमाणो आपत्तीग्रस्त भागातील शेतकरी, ग्रामस्थ, नागरिकांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ होईल, कृषिपंपांच्या वीजबिलात 33 टक्के सूट, कजर्माफी, कर्जाचे पुनर्गठन आदी स्वरूपातील मदत मिळेल. या आदेशांमुळे आता गारपीट, अतिपाऊस झालेल्या भागातील शेतक:यांना मदत आणि दिलासा मिळू शकतो. (प्रतिनिधी)