पंढरीसमीप वैष्णव दंगले रिंगणी

By admin | Published: July 8, 2014 01:08 AM2014-07-08T01:08:26+5:302014-07-08T01:08:26+5:30

पंढरपूर जवळ येत असल्याचा वारक:यांच्या चेह:यावरचा आनंद.. आणि हरिनामाचा गजर.. अशा उत्साही वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे उभे रिंगण बाजीराव विहीर येथे पार पडले.

Pandharamsam Vaishnava riots Rangee | पंढरीसमीप वैष्णव दंगले रिंगणी

पंढरीसमीप वैष्णव दंगले रिंगणी

Next
मोहन डावरे  -
बाजीराव विहीर उभे रिंगण स्थळ
दासां सर्वकाळ।
तेथे सुखाचे कल्लोळ।।
जेथे वसती हरीचे दास।
पुण्य पिके पापानास।।
फिरे सुदर्शन। घेऊनियां नारायण।।
तुका म्हणो घरी।
होय म्हणियारा कामारी।।
ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष.. पंढरपूर जवळ येत असल्याचा वारक:यांच्या चेह:यावरचा आनंद.. आणि हरिनामाचा गजर.. अशा उत्साही वातावरणात संत तुकाराम महाराज पालखीचे उभे रिंगण बाजीराव विहीर येथे पार पडले.
पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथील तालुक्यातील पहिला मुक्काम उरकून श्रीसंत तुकाराम महाराज पालखीने सोमवारी सकाळी पिराची कुरोली येथून प्रस्थान ठेवले. नंतर रिंगण सोहळ्यास वाखरी-बाजीराव विहिरीकडे पालखीने प्रस्थान केले. त्यानंतर पारंपरिक खेळ खेळत वैष्णवांचा मेळा बाजीराव विहीर येथे पोहोचला. यानंतर ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष, अभंग, कीर्तनात वैष्णवाच्या मेळ्याने हवेत उंच उडय़ा घेऊन गजर केला. नंतर रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. 
 
कार अपघातात वारक:यांसह चार ठार
तुळजापूर : दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन वारक:यांसह एका चालकाचा मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात उस्मानाबाद तालुक्यातील ताकविकी गावाजवळील वळणावर सोमवारी सकाळी घडला़ मृतांमध्ये शंकर मर्डे (5क्), बालाजी पिंटू सगर (45), नागनाथ बिरादार (35, सर्व रा. करवयाळ जि़बिदर) आणि नितीन सांगवे (3क् रा़ अलगरवाडी, जि़ लातूर) यांचा समावेश आहे.  तर व्यंकट मलप्पा सगर (6क्), एकनाथ सगर (4क्), सुरेश सगर (12) हे गंभीर जखमी झाले आहेत़
 
च्बाजीराव विहिरीजवळ झालेल्या तुकोबांच्या रिंगण सोहळ्य़ात दोनऐवजी तीन अश्व सोडण्यात आले. तिसरा अश्व जनसमुदायात शिरल्याने 10 वारकरी जखमी झाले असून, यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. रेणुका गोपाळराव आगलावे (70), गोपाळराव नामदेव आगलावे (70), प्रमिला तुकाराम जाधव (70), ज्ञानोबा भानुदास शिंदे (60), लक्ष्मण गणपत पवार (50), किसन भानुदास डाके (80) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
 
विठ्ठल नामोच्चराने हृदय कार्यक्षमतेत वाढ
पुणो : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या नामोच्चरामुळे हृदयाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असल्याचे पुण्यातील डॉक्टर आणि आध्यात्मिक केंद्राने केलेल्या अभ्यास संशोधनातून समोर आले आहे. 
वेद-विज्ञान संशोधन केंद्र आणि इनामदार हार्ट क्लिनिक यांनी संयुक्तरीत्या हे अभ्यास संशोधन केल्याची माहिती ज्येष्ठ हृदयशल्य चिकित्सक डॉ. अविनाश इनामदार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वेद-विज्ञान संशोधन केंद्राचे प्रमुख प्रसाद जोशी, डॉ. संजीवनी इनामदार, डॉ. रवी प्रयाग, सेंटर फॉर बायोफिल्ड सायन्सचे सुधीर नेऊरगावकर, ग्लोबल हेल्थच्या संशोधिका डॉ. ज्युथिका लघाटे, रॉयल पुणो नीतीशास्त्र समितीचे प्रमुख डॉ. पंकज जगताप उपस्थित होते. या सर्वानी मिळून हे संशोधन केले आहे.
डॉ. इनामदार म्हणाले, या प्रयोगासाठी आम्ही 2क् ते 6क् वयोगटातील 3क् निरोगी लोकांची निवड केली. त्यांच्या सुरुवातीला रक्तदाब, नाडीची गती, ईसीजी, 2डी इको, कलर डॉप्लर या तपासण्या केल्या. त्यानंतर त्यांना ध्यान करायला लावून काही ठराविक काळ ‘विठ्ठल’ हे नाव उच्चरण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा त्यांच्या तपासण्या केल्या. यात सर्वाच्या हृदय कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, हे संशोधन ‘एशियन जर्नल ऑफ कॉम्प्लिमेंट्री अॅन्ड अल्टरनेटिव्ह मेडिसीन’ या आंतरराष्ट्रीय जर्नलकडे पाठविले. त्यांनी त्याची सत्यता पडताळून प्रसिद्ध केले. (प्रतिनिधी)
 
नाथ महाराज पालखीतील वारक:यांचा ठिय्या
रामदास नागटिळक ल्ल पंढरपूर
नाथमहाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारक:यांनी व्होळे-कौठाळी येथील नदीवर पूल बांधावा यासाठी कौठाळी-व्होळे नदीकडेवर चार तास ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने  सकारात्मक भूमिका घेऊन रस्त्याची हमी दिल्याने पंढरपूरच्या वास्तव्यासाठी पालखी मार्गस्थ झाली. 
जोर्पयत शासन पैठण ते पंढरपूर मार्गावरील कौठाळी ते व्होळे येथे पूल बांधण्यासाठी आश्वासन देत नाही, तोर्पयत पालखी सोहळा हलविला जाणार नसल्याची भूमिका नाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. रघुनाथ महाराज यांनी घेतला. या आंदोलनास येथील ग्रामस्थ पाठिंबा देत आंदोलनात सहभागी झाले. यावेळी वारक:यांनी पूल झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.
पुढील वर्षी आषाढी वारीपूर्वी पुलाचे बांधकाम न झाल्यास पैठण येथूनच नाथ महाराज पालखीचे प्रस्थान करणार नसल्याचे ह.भ.प. रघुनाथ महाराज यांनी सांगितले. साडे येथून निघणारी संत बलभीम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. वामन महाराज शिरसाठ यांनीही पूल बांधण्याची मागणी केली.
 
तहसीलदार 5 तास कौठाळीत
च्आंदोलन करणा:या वारक:यांना पाण्यातून प्रवास करत असताना कोणताही धोका होऊ नये, यासाठी संबंधित अधिकारी व पोलिसांना सूचना करून स्वत: तहसीलदार गजानन गुरव पालखी सोहळ्यातील वारकरी पाण्यातून प्रवास करून बाहेर पडल्यानंतरच पंढरीकडे मार्गस्थ झाले.

 

Web Title: Pandharamsam Vaishnava riots Rangee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.