Pandharpur Election Results 2021: “...ते माझ्यावर सोडा”; समाधान आवताडे विजयी होताच नेटकऱ्यांना आठवलं देवेंद्र फडणवीसांचं ते विधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 05:28 PM2021-05-02T17:28:17+5:302021-05-02T17:31:02+5:30

Pandharpur Election Results 2021: निवडणूक निकालाच्या या धामधुमीत भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

pandharpur election results 2021 bjp devendra fadnavis video got viral | Pandharpur Election Results 2021: “...ते माझ्यावर सोडा”; समाधान आवताडे विजयी होताच नेटकऱ्यांना आठवलं देवेंद्र फडणवीसांचं ते विधान!

Pandharpur Election Results 2021: “...ते माझ्यावर सोडा”; समाधान आवताडे विजयी होताच नेटकऱ्यांना आठवलं देवेंद्र फडणवीसांचं ते विधान!

googlenewsNext
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ व्हायरलपोटनिवडणुकीत भाजपचा विजय

सोलापूर: देशभरात पाच राज्यांच्या निवडणूक निकालासह पोटनिवडणुकींचा निकालही (Pandharpur Election Results 2021) लागत आहे. राज्यातील मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवतडे यांचा ३ हजार ५०३ मतांनी विजय झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके पराभूत झाले आहेत. मात्र, निवडणूक निकालाच्या या धामधुमीत भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे. (pandharpur election results 2021 bjp devendra fadnavis video got viral) 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूरमधील सभेचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात फडणवीसांनी समाधान आवताडे यांना विजयी करण्याचे आवाहन करतानाच राज्यातील आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस

लोक विचारतात केवळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, याने काय फरक पडणार आहे. याने काय सरकार बदलले का? अरे सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा ते बदलू आपण. लोकशाहीत या सरकारचा अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार सुरू आहे. म्हणून या सरकारला जागा दाखवून देण्यासाठी पहिली संधी कुणाला मिळाली असेल तर ती मंगळवेढा-पंढरपुरच्या नागरिकांना मिळाली आहे. म्हणून या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे. या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. 

“भाजपने बंगाल निवडणूक प्रतिष्ठेची केली, पण जनतेने सत्तेपासून दूर ठेवलं”

ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती

ही पोटनिवडणूक जनतेने हातात घेतली होती. त्याचाच यामध्ये विजय बघायला मिळतोय. राज्य सरकारची सगळी यंत्रणा या ठिकाणी होती. तरीसुद्धा लोकांपुढे आम्ही एकत्र गेलो. लोकांना विश्वास दिला. या तालुक्यात आम्ही गेले ३० ते ४० वर्षे काम केले. सगळ्याच कार्यकर्त्यांनी जिद्दीने जिंकायची आशा केली होती. त्याचाच हा विजय आहे. विरोधकांना निकालाने उत्तर दिले आहे. मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे हा विजय शक्य झाला आहे, असे प्रशांत परिचारक यांनी म्हटले आहे.

“पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एवढ्या जागा येणे, ही फार मोठी गोष्ट”

दरम्यान, प्रशांत पारिचारिक आणि सर्व पंढरपुराने ताकद दिली होती. विजय हा जनतेचा आहे. या सरकार विरोधात जनतेने दिलेला कौल आहे. गुलाल कार्यकर्त्यांनी उधळलेला आहे, अशी प्रतिक्रिया समाधाना आवताडे यांनी दिली.
 

Web Title: pandharpur election results 2021 bjp devendra fadnavis video got viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.