पंढरपूर तीर्थक्षेत्र सुंदर तर चंद्रभागा नदी शुद्ध करणार - सुधीर मुनगंटीवार
By admin | Published: May 9, 2016 07:51 PM2016-05-09T19:51:30+5:302016-05-09T19:51:30+5:30
चंद्रभागा नदी शुद्ध करणार असल्याचे प्रतिपादन वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 9- पंढरपूर तीर्थक्षेत्र स्वच्छ आणि सुंदर करताना लाखो वारकऱ्यांच्या मनात सामाजिक समतेचा अाध्यात्मिक वारसा प्रवाहित करणारी चंद्रभागा नदी शुद्ध करणार असल्याचे प्रतिपादन वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
आज सह्याद्री अतिथीगृहात नमामी चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आणि चंद्रभागा नदीचे शुद्धीकरण यासंबंधीची आढावा बैठक वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्यासह जीवनप्राधिकरणाचे तसेच पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंढरपूरची चंद्रभाग नदी ही महाराष्ट्राच्या निखळ निरागस श्रद्धेचा मानबिंदू आहे. वारकारी आणि चंदभागा यांचे नाते अतूट असल्याने चंद्रभागेच्या पावित्र्याचे आणि निर्मळतेचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. हे लक्षात घेऊनच राज्य अर्थसंकल्पात ह्लनमामि चंद्रभागा अभियानह्व घोषित करण्यात आल्याचे सांगून वित्तमंत्री वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शासन आणि लोकसहभागातून हे अभियान राबवितांना पंढरपूर क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यालाही शासनाने प्राधान्य दिले आहे. आजमितीस तिथे १५ दशलक्ष लिटरचा सांडपाणी पक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहे. सध्या तो १२ दशलक्ष लिटर क्षमतेने सुरु आहे. आषाढी- कार्तिकी एकादशीच्या काळात वारी दरम्यान १८ दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते म्हणजेच याकाळात साधारणत: ६ दशलक्ष लिटर पक्रिया न केलेले पाणी चंद्रभागेत सोडले जाते. या प्रकल्पाची क्षमतावृद्धी करण्याचे काम नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत प्राधान्याने हाती घेतले जाणार आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात नमामि चंद्रभागा अभियानासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परंतू पंढरपूर क्षेत्राचे महत्व व तिथे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या कार्यक्रमासाठी आवश्यक तितका निधी उपलब्ध करून दिला जाईल. येत्या १ जुन २०१६ रोजी पंढरपूर मध्ये ह्लनमामि चंद्रभागाह्व परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे ही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
पंढरपूरमध्ये तुळशी उद्यानासह वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम
येत्या आठवड्यात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर पंढरपूरला जाऊन यासंबंधीची सविस्तर पाहणी करतील व बैठक घेतील असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, पंढरपूर क्षेत्रातील वनराई वाढवण्याचे काम ही वन विभागामार्फत हाती घेतले जाणार आहे. यामध्ये वृक्षलागवडीबरोबर तुळशी उद्यानासारखे उद्यान पंढरपूरमध्ये उभारण्यात येतील. मी स्वत: साबरमतीनदीच्या शुद्धीकरणाचे जे काम झाले आहे त्याची पाहणी करणार आहे. तेथे नदीकाठी झालेल्या विकास कामांची पाहणी करणार असल्याचेही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
गोदावरीच्या धर्तीवर चंद्रभागा नदीकाठी काम
आपण येत्या १३ मे रोजी पंढरपूरला जाणार असून चंद्रभागा नदीची पाहणी करणार आहोत. त्यानंतर सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, पैठण शहर हे दुसरी काशी म्हणून महाराष्ट्रास परिचित आहे. याठिकाणी संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी तसेच गोदावरी नदीत दशक्रिया विधी व अस्थी विसर्जन करण्यासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. यामुळे गोदावरी नदीचे पाणी प्रदुषित होऊ नये, तीर्थक्षेत्र परिसर स्वच्छ आणि सुंदर राहावा यादृष्टीने विविध विकास कामे हाती घेतली होती.. यामध्ये घाट बांधकाम, रक्षाकुंड, दशक्रिया विधी मंडप, काँक्रिटचे रस्ते, सुलभ शौचालय व इतर व्यवस्था कचराकुंडी, हायमास्ट विद्युतीकरण या कामांचा समावेश होता. याधर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कामं करण्यात येणार असून ही सर्व कामे जीवनप्राधिकरणामार्फत केली जातील.