प्रशांत परिचारक यांच्या राजीनाम्यासाठी पंढरपूर बंद
By admin | Published: February 23, 2017 04:17 AM2017-02-23T04:17:25+5:302017-02-23T04:17:25+5:30
आ़ प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या कुटुंबीयाविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध
पंढरपूर : आ़ प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या कुटुंबीयाविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी माजी सैनिक संघटनेतर्फे बुधवारी पंढरपूर बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन आंदोलन १०० टक्के यशस्वी केले़
माजी सैनिक संघटनेच्या मोर्चात विविध संघटना, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते़ भारतीय जवानांविषयी अपशब्द वापरणाऱ्या आ. परिचारक यांच्याविरोधात माजी सैनिकांकडून निषेध व्यक्त करणारी भाषणे झाली़ सैनिकांच्या पत्नींनी ‘बोंबाबोंब आंदोलन’ केले़ परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, शासनाने त्यांच्याकडील सर्व पदांचे राजीनामे घ्यावेत आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या़ पंढरपूर तालुक्यात भोसे, करकंब, तुंगत येथेही बंद पाळण्यात आला. (प्रतिनिधी)