कार्तिकी यात्रा पावली ४.७७ कोटीचे दान, गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 11:36 AM2023-12-02T11:36:14+5:302023-12-02T11:37:00+5:30
Pandharpur Vitthal Rukmini Mandir: यंदा कार्तिकी यात्रेदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी समितीला ४ कोटी ७७ लाख ८ हजार २६८ रुपयांचे दान दिल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
पंढरपूर - यंदा कार्तिकी यात्रेदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी समितीला ४ कोटी ७७ लाख ८ हजार २६८ रुपयांचे दान दिल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. गतवर्षीच्या कार्तिकी यात्रेपेक्षा १ कोटी ५६ लाख ४८ हजार ५२६ रुपये इतकी उत्पन्नात वाढ झाली. १४ ते २७ नोव्हेंबर यात्रा कालावधीत वरील दान मिळाले.
३ लाख ४० हजार ४७८ भाविकांनी पदस्पर्श दर्शन व ५ लाख ७१ हजार २२० भाविकांनी विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले, असे समितीचे माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
कसे कुठून मिळाले उत्पन्न
- श्रींच्या चरणावर ४०.१५ लाख
- देणगी स्वरूपात १.३० कोटी
- लाडूप्रसादातून ६२.४९ लाख
- भक्तनिवासातून ६६.६२ लाख
- सोने-चांदी, भेटवस्तू ८.३६ लाख
- २५४ परिवार देवता व हुंडीपेटीतून १.५७ कोटी
- मोबाइल लॉकर व इतर १०.९४ लाख