पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात महिला सुरक्षारक्षकाचा कपाळमोक्ष! गाभा-यात धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 10:54 AM2017-10-05T10:54:59+5:302017-10-05T11:00:46+5:30
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गुरुवारी सकाळी विठूरायाचे दर्शन घेण्यावरुन काही भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये जोरदार वादावादी झाली.
सोलापूर - पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गुरुवारी सकाळी विठूरायाचे दर्शन घेण्यावरुन काही भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये जोरदार वादावादी झाली. शाब्दीक बाचाबाचीचे पर्यावसन धक्काबुक्कीत झाले. यावेळी एका भाविकाने मंदिराच्या महिला सुरक्षारक्षकाला ढकलून दिले. ही महिला सुरक्षारक्षक गाभा-यातील दगडावर आपटून तिचा कपाळमोक्ष झाला. डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाल्याने या महिलेला तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे या महिलेवर उपचार सुरु आहेत.
विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर महिला सुरक्षारक्षक भाविकांना पुढे सरकण्यास सांगत होती. त्यातून हा वाद निर्माण झाला. धक्काबुक्की करणारे भाविक नगर जिल्ह्यतील असू शकतात असे पंढरपूर मंदिराच्या प्रतिनिधीने सांगितले.
सध्या कॅनडा सरकारच्या मदतीने पंढरपूर शहर स्मार्ट बनविण्याच्या हालचाली सुरु आहेत. भारत - कॅनडा मैत्रीला १५० वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल कॅनडाकडून भारताला गिफ्ट मिळणार आहे. यासाठी कॅनडा सरकारने २ हजार कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार केला असून कॅनेडियन दुतावासाचे प्रतिनिधी ३ ऑक्टोबरला पंढरपूरला भेट देणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली होती.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदरि परिसर, शहरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, चंद्रभागेचा विकास, सांडपाण्याची व्यवस्था यासह संपूर्ण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्यास कॅनेडियन दुतावासाच्या प्रतिनिधींनी तत्वत: मंजुरी दिली आहे.