30 लाख भाविकांना भेटणार पांडुरंग, १४ लाख वारकऱ्यांनी घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:12 AM2023-06-27T11:12:13+5:302023-06-27T11:12:36+5:30
Pandharpur: सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता शेकडो मैलांची पायपीट करत पंढरपूरला येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले
- बाळासाहेब बोचरे
मुंबई : सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता शेकडो मैलांची पायपीट करत पंढरपूरला येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यामुळे गेल्या आठ दिवसात सुमारे १४ लाख भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले. आषाढी वारी, गोपाळकाला आणि प्रक्षाळपूजेपर्यंत हेच नियोजन राहणार असल्याने सुमारे ३० लाख भाविकांना दर्शन घडणार आहे.
दरराेज पावणेदाेन लाख भाविक घेतात दर्शन
- २० जूनपासून मंदिरामध्ये २४ तास मुख दर्शनाची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे २४ तासात किमान १ लाख १५ हजार भाविकांना दर्शनाचा लाभ मिळतो.
- पददर्शनासाठी शेजारती, धुपारती, पोषाख अशा विधी टाळण्यात आल्या आहेत. नित्य पूजा, गंधाक्षता, नैवेद्य आणि लिंबू पाणी या विधीसाठी दीड तास पददर्शन बंद ठेवण्यात येते.
५,००० विशेष गाड्या : आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये साेडण्यात येतील
दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय आहे. आषाढीच्या काळात चार दिवस चहा आणि खिचडी वाटप करण्यात येणार आहे.
- गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी
मंदिरे समिती, पंढरपूर
किती भाविकांना लाभ?
n पददर्शन साडेबावीस तास सुरु असून प्रतिमिनिट ४० ते ४५ भाविक दर्शन घेतात.
n मुख दर्शन २४ तास सुरु असून - प्रतिमिनीट ८० ते ९० भाविक दर्शन घेतात.