पंकज भुजबळ यांचीही झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2016 12:45 AM2016-02-10T00:45:58+5:302016-02-10T00:45:58+5:30

न्यायालयाने समीर भुजबळ यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी भुजबळ उद्योग समूहातील आणखी एक सहसंचालक पंकज भुजबळ यांची अंमलबजावणी

Pankaj Bhujbal also wakes up | पंकज भुजबळ यांचीही झाडाझडती

पंकज भुजबळ यांचीही झाडाझडती

Next

- डिप्पी वांंकाणी,  मुंबई
न्यायालयाने समीर भुजबळ यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी भुजबळ उद्योग समूहातील आणखी एक सहसंचालक पंकज भुजबळ यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तब्बल ९ तास चौकशी केली. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात पंकज यांनाही लाच मिळाल्याचा संशय आहे.
मंगळवारी सकाळी १०.१५ वाजता पंकज त्यांच्या सीएसोबत ईडीच्या कार्यालयात हजर झाले. भुजबळ यांच्या परवेश कन्स्ट्रक्शन्स आणि देविशा इन्फ्रास्ट्रक्चर यांचा तपास सुरू असून, समीर आणि पंकज त्याचे संचालक आहेत. गुंतवणूकदारांना त्यांच्या कंपन्यांतील शेअर्स अव्यावहारिकरीत्या विकल्याचा आरोप असून, त्यातून झालेल्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित समीर यांची चौकशी करण्यात आली होती. याचबाबत पंकज यांची चौकशी करण्यात आली.
भुजबळ कुटुंबीयांमुळे सरकारच्या खजिन्याला ८७० कोटी रुपयांचा तोटा झाला, असा ईडीचा दावा आहे. समीर यांच्याप्रमाणेच पंकज यांनाही
अटक करणार काय? असे विचारले असता ‘ईडी’चे अधिकारी म्हणाले की, समीर तपासात सहकार्य करीत नव्हते, म्हणून त्यांना अटक करण्यात आली. कदाचित, समीर आणि पंकज यांची आमनेसामने चौकशी केली जाईल.
दुपारच्या वेळी या प्रतिनिधीने ‘ईडी’च्या कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी पंकज तेथे लॉबीमध्ये सोफ्यावर अत्यंत अस्वस्थ स्थितीत बसल्याचे दिसून आले.
आपल्याला कोणते प्रश्न विचारले, असे विचारले असता, आपण तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करीत असून, गरज पडल्यास पुन्हा येऊ, असे उत्तर त्यांनी दिले.

Web Title: Pankaj Bhujbal also wakes up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.