पंकज भुजबळ यांना अटकेपासून तूर्तास दिलासा
By Admin | Published: August 9, 2016 04:23 AM2016-08-09T04:23:06+5:302016-08-09T04:23:06+5:30
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पंकज भुजबळ यांच्यासह अन्य आरोपींना अटकेपासून तूर्तास दिलासा दिला आहे.
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पंकज भुजबळ यांच्यासह अन्य आरोपींना अटकेपासून तूर्तास दिलासा दिला आहे. २६ आॅगस्टपर्यंत या सर्वांना अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाले (ईडी) दिले.
विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अॅक्ट) न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी पंकज भुजबळ यांच्यासह अन्य काही जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यामुळे त्यांच्यासह
सर्वांनी अटकपूर्व जामिनासाठी
उच्च न्यायालयात धाव घेतली. या सर्व याचिकांवरील सुनावणी न्या. पी. एन. देशमुख यांच्यापुढे होती. उच्च न्यायालयाने या सर्व याचिकांवरील सुनावणी २६ आॅगस्टपर्यंत
तहकूब करीत तोपर्यंत या सर्व आरोपींना अटक न करण्याचा आदेश ईडीला दिला.
ईडीने महाराष्ट्र सदन घोटाळा, कलिना भूखंड हडप प्रकरणी ३०
मार्च रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर आणि मुलगा पंकज यांचा समावेश आहे. त्याचबरोबर डी. बी. रिअॅल्टी, बलवा ग्रुप,
नीलकमल रिअॅल्टर्स अॅण्ड बिल्डर्स, नीलकमल सेंट्रल अपार्टमेंट एलएलपी आणि काकडे इन्फ्रास्ट्रक्चर्सचा आरोपी म्हणून समावेश आहे. (प्रतिनिधी)