पंकजा मुंडेंची दांडी मारण्यात आघाडी

By admin | Published: August 3, 2015 01:10 AM2015-08-03T01:10:48+5:302015-08-03T01:42:09+5:30

राज्य मंत्रिमंडळाच्या आतापर्यंतच्या सर्व बैठकींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर उपस्थित राहिले

Pankaja Mundane beats lead | पंकजा मुंडेंची दांडी मारण्यात आघाडी

पंकजा मुंडेंची दांडी मारण्यात आघाडी

Next

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आतापर्यंतच्या सर्व बैठकींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर उपस्थित राहिले. या बैठकींना दांडी मारण्यात अव्वल ठरल्या ग्रामविकास व महिला-बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे.
भाजपा ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी सत्तेवर आली.त तेव्हापासून आतापर्यंत मंत्रिमंडळाच्या २८ बैठकी झाल्या. त्यातील ९ बैठकींना मुंडे उपस्थित नव्हत्या. त्या खालोखाल सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे -७ बैठकी, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत -६, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले - प्रत्येकी ५, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता व पर्यावरणमंत्री रामदास कदम - प्रत्येकी ४, महसूलमंत्री एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रत्येकी तीन बैठकींना अनुपस्थित होते. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मुख्य सचिवांच्या कार्यालयातून मिळविली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Pankaja Mundane beats lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.