कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पंकजा मुंडेंनी दिला 'हा' सल्ला, म्हणाल्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:35 PM2020-03-17T12:35:38+5:302020-03-17T12:36:19+5:30

नियोजनबद्धपणे मुंबई बंद ठेवण्यात आली तर त्याचा लाखो लोकांना उपयोग होईल, असं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

Pankaja Munde advised to prevent corona infection | कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पंकजा मुंडेंनी दिला 'हा' सल्ला, म्हणाल्यात...

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पंकजा मुंडेंनी दिला 'हा' सल्ला, म्हणाल्यात...

Next

मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. तर नियोजनबद्धपणे मुंबई बंद ठेवण्यात आली तर त्याचा लाखो लोकांना उपयोग होईल, असं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

पंकजा मुंडे यानी ट्वीट करत म्हंटलं आहे की, मुंबई बंदची मदत होऊ शकते का? जर हे नियोजनबद्धपणे मुंबई बंद केली तर लोक यासाठी तयारी म्हणून जीवनावश्यक वस्तू घरात आणून ठेवतील. तसेच 7 दिवसांसाठी लोकल ट्रेन बंद राहिल्या तर लाखो लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यात मदत होईल, असेही पंकजा मुंडे म्हणाल्यात.

तर राज्यातील कोणत्याही शहरांना लॉकडाऊन करणार नाही किंवा पूर्णपणे शटडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही. तसेच, हॉटेल बंद करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही. काही हॉटेलमध्ये विलगीकरणाची सोय करण्याचा विचार सुरू आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Web Title: Pankaja Munde advised to prevent corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.