'पंकजाताईला मुख्यमंत्री करा...', पंकजा मुंडेंसमोर कार्यकर्त्यांच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:55 PM2022-06-22T12:55:10+5:302022-06-22T12:55:22+5:30

Maharashtra Political Crisis: कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत घोषणाबाजी करताच पंकजा मुंडे खळखळून हसल्या.

Pankaja Munde | BJP worker shouted make pankaja munde CM of maharashtra | 'पंकजाताईला मुख्यमंत्री करा...', पंकजा मुंडेंसमोर कार्यकर्त्यांच्या घोषणा

'पंकजाताईला मुख्यमंत्री करा...', पंकजा मुंडेंसमोर कार्यकर्त्यांच्या घोषणा

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी बंडखोरी पाहायला मिळाली आहे. सेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे 35 आमदारांना घेऊन गुजरातला गेले, त्यानंतर तेथून गुवाहाटी येथे दाखल झाले आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. इकडे राज्याची अशी परिस्थिती झाली आहे, तर तिकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कार्यक्रमात वेगळाच सूर ऐकू आला आहे.

'कार्यकर्त्यांच्या अपेक्षेमुळे...'
बीडच्या आष्टी येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून पंकजा मुंडेंनामुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली. 'पंकजाताई भावी मुख्यमंत्री. पंकजाताईला मुख्यमंत्री करा', अशा घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांच्या घोषणा ऐकून पंकजा मुंडे खळखळून हसल्या. "कार्यकर्त्यांच्या अपेक्षांमुळे माझी डोकेदुखी होते", अशी मिश्किल टिप्पणी यावेळी पंकजा मुंडेंनी केली.

'मी म्हणाले, गप रे...'
त्या पुढे महणाल्या की, "माझा कार्यक्रम सुरू होता, तेव्हा आमचा एक उत्साही कार्यकर्ता उठून घोषणा देऊ लागला. पण ती घोषणा दिल्याबरोबर बाकी सगळे एकत्र म्हणाले, गप रे...मी म्हटलं आत्ता यांना माझी खरी काळजी वाटायला लागली आहे. त्यांच्या लक्षात आलं आहे की, आपले ताईंवर जे प्रेम आहे, त्याचे कधीकधी आपण अघोरी प्रदर्शन करतो", असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

एकनाथ शिंदे प्रकरणावर प्रतिक्रिया
दरम्यान, यावेळी पंकजा मुंडे यांनी एकनाथ शिंदे सावध प्रतिक्रिया दिली. "मी काल दिवसभर टीव्हीही बघितला नाही. त्या प्रकरणाबाबत तुम्हाला जेवढी माहिती आहे, तेवढीच मलाही आहे. त्यामुळे या प्रकरणावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही'', अशी सावध भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतली.

Web Title: Pankaja Munde | BJP worker shouted make pankaja munde CM of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.