पंकजा मुंडे यांना परळीत शिवसेनेने दिले आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 06:12 AM2018-02-23T06:12:45+5:302018-02-23T06:12:54+5:30

ग्रामविकास मंत्री पंकजा यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून ती जबाबदारी देगलूरचे सेना आमदार सुभाष साबणे यांच्यावर सोपविली आहे.

Pankaja Munde gave challenge to Shivsena in Parli | पंकजा मुंडे यांना परळीत शिवसेनेने दिले आव्हान

पंकजा मुंडे यांना परळीत शिवसेनेने दिले आव्हान

Next

मुंबई/ परळी (जि. बीड) : ग्रामविकास मंत्री पंकजा यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून ती जबाबदारी देगलूरचे सेना आमदार सुभाष साबणे यांच्यावर सोपविली आहे.
आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करून तशी तयारीही शिवसेनेने सुरू केली आहे. परळी विधानसभा मतदारसंघाकडे नेहमीच संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते. भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्टÑवादीचे धनंजय मुंडे हे कट्टर प्रतिस्पर्धी या मतदारसंघात आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांना बहिण मानून शिवसेनेचा उमेदवार उभा केला नव्हता. तर परळीमध्ये २०१४ च्या निवडणुकीत पंकजा विरुद्ध त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे अशी लढत झाली होती आणि पंकजा यांनी बाजी मारली होती. आता या दोघांचीच पुन्हा लढत होणार असे मानले जात असताना शिवसेनेने उडी घेत लढत तिरंगी होणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र आता शिवसेनेने परळीवर लक्ष केंद्रीत केले असून नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे सेना आमदार सुभाष साबणे यांच्यावर या मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे.
पंकजांनी आव्हान स्वीकारले
लढून जिंकण्यातच मजा असते आणि मी तर लढायला तयारच आहे, असे सांगत मंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसेनेच आव्हान स्वीकारले.

Web Title: Pankaja Munde gave challenge to Shivsena in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.