पंकजा मुंडे, खडसे आक्रमकच; तर तावडे 'सायलंट मोड'वर !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 04:28 PM2019-12-11T16:28:07+5:302019-12-11T16:28:40+5:30

पंकजा मुंडे भाजपमध्ये पॉवरफुल नेत्या मानल्या जातात. त्यांची नाराजी भाजपला डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन होणार हे निश्चित असले तरी खडसे यांच काय होणार यावर काहीही ठरलं नाही.

Pankaja Munde, Khadse Aggressive; Tawde on 'Silent Mode'! | पंकजा मुंडे, खडसे आक्रमकच; तर तावडे 'सायलंट मोड'वर !

पंकजा मुंडे, खडसे आक्रमकच; तर तावडे 'सायलंट मोड'वर !

Next

मुंबई  - विधानसभा निवडणुकी प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरूनही भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर आहे. भाजप विरोधात बसताच पक्षातील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पंकजा आणि खडसे काय भूमिका घेणार याकडे भाजपचे लक्ष लागले आहे. मात्र तावडे सध्यातरी साटलंट मोडमध्ये गेल्याचे दिसून येत आहे. 

माजीमंत्री पंकजा मुंडे परळीतून पराभव झाल्यापासून शांत होत्या. त्यानंतर त्यांनी फेसबूकवर पोस्ट करून आपण आपली भूमिका 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावरून स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते. तर खडसे यांनी आधी शरद पवार आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचवेळी तावडे देखील ओबीसी नेत्यांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे उभय नेते शिवसेनेत जातात की काय अशी चर्चा सुरू झाली होती. 

मुंडे आणि खडसे यांच्या नाराजीत तावडे यांचाही सूर मिळाला होता. मात्र काही दिवसांतच तावडे सायलंट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तावडे यांची नाराजी पक्षाकडून दूर करण्यात आली का, असे प्रश्न उपस्थित होत आहे. तर पंकजा आणि खडसे यांच्या बाबतीत पक्ष अशी काही भूमिका घेणार हे पंकजा मुंडे यांच्या गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमानंतरच स्पष्ट होणार आहे. 

पंकजा मुंडे भाजपमध्ये पॉवरफुल नेत्या मानल्या जातात. त्यांची नाराजी भाजपला डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन होणार हे निश्चित असले तरी खडसे यांच काय होणार यावर काहीही ठरलं नाही. त्यामुळे मुंडे, खडसे आपल्या भूमिकेवर ठाम असले तरी तावडे यांनी आपली तलवार म्यान केल्याचे बोलले जात आहे. 
 

Web Title: Pankaja Munde, Khadse Aggressive; Tawde on 'Silent Mode'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.