पंकजा मुंडे नाहीत 'चौकीदार'; ट्विटरवर जुनंच नाव कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:10 PM2019-03-18T16:10:51+5:302019-03-18T16:14:35+5:30

केंद्रासह राज्यातील भाजपा मंत्र्यांनी, नेत्यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लिहिला आहे.

pankaja munde not joined BJPs chowkidar social media poll campaign started by pm modi | पंकजा मुंडे नाहीत 'चौकीदार'; ट्विटरवर जुनंच नाव कायम

पंकजा मुंडे नाहीत 'चौकीदार'; ट्विटरवर जुनंच नाव कायम

Next

मुंबई: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या चौकीदार चोर है या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सोशल मीडियावरुन उत्तर दिलं. मोदींनी त्यांच्या ट्विटरवरील नावापुढे चौकीदार शब्द लावला. त्यानंतर भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी, खासदारांनी, नेत्यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडला. मोदींच्या समर्थकांनीदेखील त्यांच्या नावापुढे हा शब्द जोडत त्यांना समर्थन दिलं. यानंतर ट्विटरवर हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. 

पंतप्रधान मोदींनी नावापुढे चौकीदार लावल्यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी लगेच ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला. यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेकांनी याचं अनुकरण केलं. राज्याच्या पातळीवरही हाच ट्रेंड दिसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लिहिला. भाजपाच्या इतर मंत्र्यांनीही हे कॅम्पेन फॉलो केलं. मात्र ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लिहिला नाही. 



फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लावला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख,  महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, पर्यावरणमंत्री प्रवीण पोटे यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला आहे. मात्र पंकजा मुंडेंसह पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी त्यांच्यापुढे चौकीदार शब्द जोडलेला नाही. 
 

Web Title: pankaja munde not joined BJPs chowkidar social media poll campaign started by pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.