४५ तोळं सोनं अन् व्यवसाय शेती, स्वत:ची गाडीही नाही; पंकजा मुंडेंची संपत्ती किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 12:51 PM2024-07-03T12:51:43+5:302024-07-03T12:53:47+5:30
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. अर्जासोबत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.
मुंबई : या महिन्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी जवळपास १२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांच्यासह एकूण पाच जणांना भाजपाने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडेंना विधान परिषदेत संधी मिळाल्याने त्यांचा राजकीय वनवास आता संपणार, अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. अर्जासोबत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, पंकजा मुंडे यांच्यावर जवळपास पावणे चार कोटींचे कर्ज आहे. तसेच, त्यांच्याकडे तब्बल ४५ तोळे सोने असल्याचे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
याचबरोबर, पंकजा मुंडे यांच्याकडे स्वत:ची एकही गाडी नाही. त्यांची स्थावर व जंगम अशी मिळून संपत्ती सुमारे ७ कोटी रुपयांची आहे. तसेच, पंकजा मुंडे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांचा मुख्य व्यवसाय शेती व समाजसेवा आहे. शेती, भाडे व माजी विधानसभा सदस्यांचे निवृत्तीवेतन हा त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे.
पंकजा मुंडे यांची संपत्ती किती?
- ४५ तोळं सोनं
- नावावर एकही गाडी नाही.
- विविध बँक खात्यात ९१ लाख २३ हजार ८६१ रुपयांच्या ठेवी
- सोने - ४५० ग्रॅम. किंमत - ३२ लाख ८५ हजार
-चांदी - चार किलो. किंमत ३ लाख २८ हजार
- शेअर व म्युच्युअल फंडात १ कोटी २८ लाख ७५ हजार ६९४ रुपयांची गुंतवणूक
- स्थावर मालमत्तेची एकूण किंमत - ९६ लाख ७३ हजार ४९० रुपये
- जंगम मालमत्तेची एकूण किंमत - ६ कोटी ८ लाख १५ हजार ७०९ रुपये
- एकूण कर्ज - २ कोटी ७४ लाख ८९ हजार ५१८ रुपये
- पतीच्या नावावर बँक कर्ज - २ कोटी ५० लाख ३२ हजार ४२७ रुपये
- पतीच्या नावे वैयक्तिक कर्ज - २४ कोटी ७७ लाख ७५ हजार ९१८
- रोख रक्कम - २ लाख ८४ हजार ५३०
- इतर दागिने - २ लाख ३० हजार
- शेती अवजारे - ४० हजार रुपये
- कॉम्प्युटर्स, प्रिंटर्स- १५ हजार ८०० रुपये
पंकजा यांच्या पतीच्या नावावरील दागिने...
- सोनं - २०० ग्रॅम - मूल्य १३ लाख
- चांदी - २ किलो - मूल्य १ लाख ३८ हजार
- इतर दागिने - २ लाख १५ हजार