'परळी सुन्न, राज्याची मान खाली गेली'; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेवर अप्रत्यक्ष निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 03:33 PM2021-09-07T15:33:21+5:302021-09-07T15:36:20+5:30
Dhananjay Munde : करुणा शर्मा प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची भाजपची मागणी.
बीड: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा दोन दिवसांपूर्वी परळीत आल्या होत्या. त्या परळीत आल्यानंतर मुंडे समर्थकांकडून त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. यादरम्यान, जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तुल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या सर्व प्रकरणानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका ट्विटचीही सध्या चर्चा होत आहे.
अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो.शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये,wrong president should not be set!ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 7, 2021
बीड जिल्ह्यातील परळी शहरात झालेल्या सर्व प्रकारानंतर पंकजा मुंडे यांनी राज्याची मान खाली गेल्याची प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं, 'अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कुणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची !!', अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी करुणा शर्मा प्रकरणावर भाष्य केलं.
भाजपकडून करुणा शर्मा यांना पाठिंबा
धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा यांनी परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्या परळीत आल्यावर मुंडे समर्थकांकडून त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. त्यांच्या गाडीला घेराव घालून, घोषणाही देण्यात आल्या. यादरम्यान, त्यांच्या गाडीत एक पिस्तुल आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला.
https://t.co/fDYd3Tj6b9
— Lokmat (@MiLOKMAT) September 7, 2021
असदुद्दीन औवैसी आजपासून तीन दिवसांच्या यूपी दौऱ्यावर आहेत.#AIMIM#Ayodhya
पण, त्यांच्या गाडीत एक व्यक्ती काहीतरी वस्तु ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून करुणा शर्मा यांना अडकवण्यात येत असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली. करुणा शर्मा यांच्यावर अन्याय होत असल्याचं मत व्यक्त करत करुणा यांना मदत करणार असल्याची घोषणा भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल टाकण्यातं आलं, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.