तिकीट नाकारले अन् पंकजा समर्थक संतापले; औरंगाबादेत धरपकड, सहा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 08:54 AM2022-06-10T08:54:23+5:302022-06-10T08:54:46+5:30
Pankaja Munde : ‘‘एनडीपीएस’ पथकाने लावलेल्या सापळ्यात राम धोंडू काळे याला पकडले. त्याच्याकडे नायट्रोसन नावाच्या ४५ गोळ्या आढळून आल्या. तसेच विकलेल्या गोळ्यांचे १३९० रुपये आणि मोबाइल पोलिसांनी जप्त केला.
औरंगाबाद : नशेच्या गोळ्यांची विक्री करताना ‘एनडीपीएस’ पथकाने दोघांना पकडले. त्यांच्या चौकशीत परभणी, सेलू येथील डॉक्टरांच्या लेटरहेडवर लातूर, परभणीतील वेगवेगळ्या मेडिकलमधून गोळ्यांची खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईत ६०० नशेच्या गोळ्यांसह १० लाख २४ हजार २८२ रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.
‘‘एनडीपीएस’ पथकाने लावलेल्या सापळ्यात राम धोंडू काळे याला पकडले. त्याच्याकडे नायट्रोसन नावाच्या ४५ गोळ्या आढळून आल्या. तसेच विकलेल्या गोळ्यांचे १३९० रुपये आणि मोबाइल पोलिसांनी जप्त केला.
भाजपकडून ‘नो कॉमेंट्स’
भारतीय जनता पक्षाच्या उस्मानपुरा येथील विभागीय कार्यालयावर माजी मंत्री पंकजा मुंडे समर्थकांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी आ. अतुल सावे यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले.
या घटनेवर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असे आ. सावे यांनी सांगितले, तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पाथर्डीत समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न
पाथर्डी (जि. अहमदनगर) येथे पंकजा मुंडे यांचा समर्थक असलेल्या मुकुंद गर्जे यांनी गुरुवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित मित्रांनी गर्जे यांंना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, पुढचा धोका पाहता त्यांना अहमदनगरच्या एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.