पंकजा मुंडेंच्या संघर्ष यात्रेची चौकशी
By admin | Published: September 14, 2014 01:44 AM2014-09-14T01:44:22+5:302014-09-14T01:44:22+5:30
आमदार पंकजा मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग झाल्याची शक्यता व्यक्त करीत दौ:याची माहिती मागविली आहे.
Next
नाशिक : राज्यात सत्तापरिवर्तनाच्या हेतूने भाजपा नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग झाल्याची शक्यता व्यक्त करीत, जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून मुंडे यांच्या दौ:याची माहिती मागविली आहे.
पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेचे शुक्रवारी जिलत आगमन झाले, त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा काहीच अडसर नव्हता, मात्र साडेचार वाजता निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा व आचारसंहिता लागू केल्यानंतर मुंडे यांची संघर्ष यात्र पुढे सुरू ठेवावी किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त करण्यात आली. दुपारी साडेचार वाजेर्पयत संघर्ष यात्रेविषयी फारसे गांभीर्याने घेण्यासारखे काहीच नसले तरी त्यानंतर मात्र सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान संघर्ष यात्र लासलगावला पोहोचल्यावर भाजपा कार्यकत्र्यानी ङोंडे, पताका व जोरदार राजकीय घोषणाबाजी करून वातावरण निर्मिती केली. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी राजकीय भाषणही ठोकले. त्यानंतर नाशिक येथे आडगाव नाक्यावर या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले व तेथून भाजपाचे ध्वज व निवडणूक चिन्ह असलेली मोटारसायकल रॅलीही शहरातून काढण्यात आली. संघर्ष यात्रेची रीतसर परवानगी भाजपाने पोलिसांकडून घेतली असली तरी ती आचारसंहिता लागू होण्यापूर्वी असल्याने पोलिसांनी या यात्रेच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या अंगानेच अनुमती दिली होती; परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतरही यात्रेच्या माध्यमातून राजकीय प्रदर्शन आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा अर्थ काढला जात आहे.
चौकशीचा ससेमिरा..
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तत्काळ शहरातील राजकीय पक्षांचे फलक, बॅनर्स, ङोंडे काढण्यात येऊन जाहीर राजकीय कार्यक्रमांना त्या त्या मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिका:यांकडून अनुमती घेण्याचा दंडक असताना मुंडे यांच्या आचारसंहितेनंतरच्या राजकीय कार्यक्रमांना अनुमती होती किंवा कसे तसेच या कार्यक्रमांची निवडणूक भरारी पथकाने व व्हिडीओ पथकाने दखल घेतली काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दुपारी साडेचार वाजता निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांनी विशेष करून त्याचे पालन करणो आवश्यक आहे. पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेचे स्वागत, शहरात लावलेले फलक, बॅनर व ङोंडे तसेच जाहीर सभा यासाठी परवानगी घेतली होती किंवा नाही याची खातरजमा केली जाईल व निवडणूक अधिकारी म्हणून स्वत:हून या घटनेची चौकशी करून प्रसंगी कारवाई करू.
- गणोश राठोड, तहसीलदार