पंकजा पोहोचल्या, मात्र पहिल्यांदाच सर्वसामान्यांसाठी समाधी दर्शन बंद
By admin | Published: October 11, 2016 01:52 PM2016-10-11T13:52:58+5:302016-10-11T15:03:01+5:30
भगवानगडवर सभा घेण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे दर्शनासाठी गडावर पोहोचल्या आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ११ - भगवानगडावर गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा यंदा वादात सापडलेला असतानाच पंकजा मुंडे यांनी मात्र ठाम राहत भगवान गडावर जाऊन दर्शन घेतले. विजयादशमीच्या मुहूर्तावर दुपारच्या सुमारास पंकजा गडाच्या पायथ्याशी पोहोचल्या. मात्र प्रचंड गर्दीमुळे त्यांना वर जाण्यास अडथळा निर्माण झाला. महंत आणि पंकजा मुंडे यांच्या वादात सामान्य लोकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. पंकजा दर्शनासाठी गडावर गेल्यामुळे सर्वसामान्यांसाठी समाधी दर्शन ठेवण्यात आले आहे. गेल्या ५० वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा यंदा वादात सापडला आहे. गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी गडावर दसऱ्याला कोणालाही भाषण करता येणार नाही, अशी भूमिका घेतल्याने मंत्री पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यावर गंडांतर आले. ळाव्याला परवानगी मागितलेली जागा गडाचे अध्यक्ष नामदेवशास्त्री यांच्या नावावर असून त्यांनी या जागेवर कोणत्याही मेळाव्यास परवानगी देऊ नये, असे कळविल्याचे कारण पुढे करत पाथर्डी तहसीलदारांनी परवानगी नाकारली. तसेच गडाच्या परिसरात जमावबंदीचा आदेश सायंकाळी लागू केला आहे. मात्र, गडाच्या पायथ्याशी असलेल्या खरवंडी गावात मेळावा घेण्यास रात्री उशिरा पाथर्डी तहसीलदारांनी परवानगी देण्यात आली आहे.