पानसरे-दाभोलकर हत्या प्रकरण: वीरेंद्र तावडेच्या जामिनावर ४ जानेवारीला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 03:31 AM2017-12-23T03:31:47+5:302017-12-23T03:33:26+5:30
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याच्या जामिनावर दि. ४ जानेवारी २०१८ रोजी सुनावणी होणार आहे.
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याच्या जामिनावर दि. ४ जानेवारी २०१८ रोजी सुनावणी होणार आहे. सरकार पक्षातर्फे तावडेच्या जामिनावर म्हणणे सादर न केल्याने शुक्रवारी होणारी सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी पुढे ढकलली.
पानसरे हत्या प्रकरणातील डॉ. तावडे हा दुसरा संशयित आहे. या प्रकरणातील समीर गायकवाड हा सध्या जामिनावर बाहेर आहे.