पानसरे हत्या प्रकरण; मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 03:11 PM2017-08-02T15:11:27+5:302017-08-02T15:14:15+5:30

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय  पवार या दोघांना पकडून देणाऱ्यांना १० लाख रूपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

Pansare murder case; 10 lakhs reward for informing the killers | पानसरे हत्या प्रकरण; मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस

पानसरे हत्या प्रकरण; मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस

Next
ठळक मुद्देकॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय  पवार या दोघांना पकडून देणाऱ्यांना १० लाख रूपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपींना पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करावं, असा प्रस्ताव तपास यंत्रणेने राज्य सरकारकडे पाठवला होता विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचं बक्षीस देण्याचा प्रस्ताव गृहविभागाने बुधवारी संमत केला आहे.

कोल्हापूर, दि. 2- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय  पवार या दोघांना पकडून देणाऱ्यांना १० लाख रूपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपींना पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करावं, असा प्रस्ताव तपास यंत्रणेने राज्य सरकारकडे पाठवला होता. गृहविभागाने हा प्रस्ताव मंजूर केला असून, फरारी आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचं बक्षीस देण्याचा प्रस्ताव गृहविभागाने बुधवारी संमत केला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्याला राज्य सरकारने १० लाखांचे बक्षीस जाहीर केलं असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे

कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर विनय पवार आणि सारंग आकोलकर या दोघांनी गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. पानसरे यांच्या पत्नी उमा यांनीही या दोघांचे फोटो ओळखले आहेत. याशिवाय एका साक्षीदारानेही पवार आणि अकोलकर पिस्तूल मिळवण्यासाठी बिंदू चौकातील दुकानात आल्याची साक्ष पोलिसांकडे दिली. पोलिसांच्या ताब्यात असलेला समीर गायकवाड याच्याशी या दोघांचाही संपर्क आल्याचे तपासात समोर आलं आहे. मात्र, पानसरे यांची हत्या झाल्यापासून हे दोघीही फरार आहेत. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही बजावण्यात आलं आहे. तरीही ते पोलिसांच्या हाती आलेले नाहीत.त्यामुळे त्यांच्यावर अखेर बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पानसरे यांच्यावर फेब्रुवारी २०१५ मध्ये हल्ला झाला होता. या प्रकरणी सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड आणि विरेंद्र तावडे यांच्यासह विनय पवार आणि सारंग अकोलकर या दोघांवर विशेष तपास यंत्रणेनं दोषारोप दाखल केलं आहे. यापैकी विरेंद्र तावडे दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे, तर समीर गायकवाडला नुकताच जमीन मंजूर झाला आहे. 

फेब्रुवारी 2015 मध्ये झाली पानसरेंची हत्या
कॉम्रेड गोविंद पानसरे त्यांच्या सागरमाळ परिसरातील घरापासून मॉर्निंग वॉकहून परत येताना त्यांच्यासह पत्नी उमा पानसरे यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या चार मारेकऱ्यांनी 16  फेब्रुवारी २०१५ रोजी गोळीबार केला होता. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांचा २० फेब्रुवारीला उपचार सुरु असताना मुंबईतील जे.जे.रुग्णालयात मृत्यू झाला होता. उमा पानसरे यांच्याही डोक्याला गोळी चाटून गेली होती परंतू त्यातून त्या बचावल्या. त्यानंतर विशेष तपास पथकांने ‘सनातन’ संस्थेचा पूर्ण वेळ साधक असलेल्या समीर गायकवाड याला १६ सप्टेंबर २०१५ अटक केली होती. तेव्हा पासून तो पोलिसांच्या ताब्यात होता.
 

Web Title: Pansare murder case; 10 lakhs reward for informing the killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.