पनवेल-चिपळूण डेमू ट्रेन
By admin | Published: August 10, 2015 01:18 AM2015-08-10T01:18:47+5:302015-08-10T01:18:47+5:30
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहता पनवेल-चिपळूण या मार्गावर डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहता पनवेल-चिपळूण या मार्गावर डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. ही ट्रेन ८ सप्टेंबरपासून सोडली जाणार असून, तिच्या ३६ फेऱ्या होणार आहेत.
ही ट्रेन पनवेल स्थानकातून सकाळी ११.१0 वाजता सुटेल आणि चिपळूणमध्ये सायंकाळी ४ वाजता दाखल होईल; तर पुन्हा चिपळूणमधून साडे पाच वाजता सुटून पनवेल स्थानकात रात्री साडे दहा वाजता दाखल होईल. मात्र ही ट्रेन पॅसेंजर म्हणून चालवणार की आरक्षित याबाबत अद्याप निर्णय झाला नसून त्यामुळेच तिचे भाडेही निश्चित झाले नसल्याचे सांगण्यात आले.
कोकणासाठी सध्या नियमित ट्रेन धावतच आहेत. गणेशोत्सवासाठी दर वर्षी जादा ट्रेन सोडण्यात येतात. मागील वर्षी २१४ जादा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. यंदाही त्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे. कोकणात खेड आणि चिपळूणपर्यंत जाणारे प्रवासी पाहता त्यांना रेल्वेने प्रवास करताना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो. या प्रवाशांना या डेमू ट्रेनमुळे दिलासा मिळणार आहे.