पनवेल-चिपळूण ५0 रुपयांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2016 01:26 AM2016-08-19T01:26:21+5:302016-08-19T01:26:21+5:30

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना मध्य रेल्वे या वर्षी पुन्हा एकदा स्वस्तातला प्रवास घडवणार आहे. पनवेल ते चिपळूण अशी अनारक्षित ट्रेन गणेशोत्सवादरम्यान मध्य रेल्वेकडून सोडली

Panvel-Chiplun Rs. 50 | पनवेल-चिपळूण ५0 रुपयांत

पनवेल-चिपळूण ५0 रुपयांत

Next

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना मध्य रेल्वे या वर्षी पुन्हा एकदा स्वस्तातला प्रवास घडवणार आहे. पनवेल ते चिपळूण अशी अनारक्षित ट्रेन गणेशोत्सवादरम्यान मध्य रेल्वेकडून सोडली जाणार आहे. या प्रवासासाठी यंदाही प्रवाशांना अवघे ५0 रुपये मोजावे लागतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. पनवेल ते चिपळूण ट्रेनच्या ३६ फेऱ्या होतील.
ट्रेन क्रमांक 0११0७ पनवेल-चिपळूणच्या पहिल्या फेरीला २९ आॅगस्ट रोजी सुरुवात होईल. ही ट्रेन पनवेलहून ११.१0 वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी १६.00 वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 0११0८ चिपळूण-पनवेलची पहिली फेरीही त्याच दिवशी होईल.
चिपळूण येथून ट्रेन १७.३0 वाजता सुटून पनवेल येथे त्याच दिवशी २२.३0 वाजता पोहोचेल. ट्रेनला पेण, रोहा, कोलाड, इंदापूर रोड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड व अजनी या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या अनारक्षित ट्रेन १२ डब्यांच्या असतील. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, मागील वर्षी ही ट्रेन सुरू करण्यात आली आणि तिला चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा पुन्हा एकदा भाडेही मागील वर्षीप्रमाणेच ठेवले आहे. (प्र्रतिनिधी)

गेल्या वर्षी ४0 फेऱ्या
गेल्या वर्षी या ट्रेनच्या ४0 फेऱ्या झाल्या होत्या. यंदा त्याच्या ३६ फेऱ्या होत आहेत. पनवेल-चिपळूण-पनवेल ट्रेन नंबर 0११0७ आणि ट्रेन नंबर 0११0८ आॅगस्टच्या २९,३0,३१ तारखेला तर सप्टेंबर महिन्याच्या २, ३, ४, ६, ७, ८, १0, ११, १२, १४, १५, १६, १८, १९, २0 तारखेला सोडण्यात येईल.

गेल्या वर्षी या ट्रेनला एक एसी डबाही जोडण्यात आला होता. त्याचे तिकीट ३९५ रुपये होते. एसी डब्यातून प्रवास करण्यासाठी आधीच आरक्षणाची तारीख देण्यात आली होती. यंदा मात्र एसी डबा जोडलेला नाही.

गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून यंदा १४२ विशेष जादा ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मध्य व कोकण रेल्वेकडून आणखी काही जादा ट्रेनचे नियोजन केले जात आहे.

Web Title: Panvel-Chiplun Rs. 50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.