Panvel Crime News: पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर सहा लाखाची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 07:49 PM2024-10-25T19:49:01+5:302024-10-25T19:52:51+5:30

एसएसटी पथकाने पळस्पे फाटा चेक पोस्ट येथे सकाळी 11:55 वाजण्याचे दरम्यान गोवा-पनवेल हायवे कारवाई करत सहा लाख रुपयांची रक्कम जप्त केली.

Panvel Crime News: Six lakh cash seized at Palaspe check post | Panvel Crime News: पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर सहा लाखाची रोकड जप्त

Panvel Crime News: पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर सहा लाखाची रोकड जप्त

वैभव गायकर, पनवेल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या पथकाने पनवेलजवळ मोठी कारवाई केली. एसएसटी पथकाने शुक्रवारी (25 ऑक्टोबर)पळस्पे फाटा चेक पोस्ट येथे सकाळी वाजेच्या सुमारास गोवा-पनवेल हायवे रोडवरून जाणाऱ्या एका कारमधून सहा लाख रुपयांची रक्कम जप्त केली. 

एसएसटी पथकाने पळस्पे फाटा चेक पोस्ट येथे सकाळी 11:55 वाजण्याचे दरम्यान गोवा-पनवेल हायवे रोडवरून जाणाऱ्या राखाडी रंगाच्या टाटा पंच चार चाकी गाडीस थांबवून तपासणी केली असता, त्या गाडीमध्ये ६ लाखाची रोख रक्कम आढळून आली. सदरील रक्कम संशयास्पद असल्याने ही रक्कम पथकामार्फत जप्त करण्यात आली.

सदर कारवाई १८८ पनवेल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईवेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख भारत राठोड, सहाय्यक खर्च निरीक्षक विजय फासे, सहाय्यक खर्च निरीक्षक संजय आपटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय भालेराव, आचार संहिता पथक प्रमुख संदीप कराड, आचार संहिता सनियंत्रण अधिकारी शरद गीते, सहाय्यक आचार संहिता पथक प्रमु. जी.एस. बहीरम, सहाय्यक आचार संहिता पथक समन्वयक दिनेश भोसले,नितेश चिमणे,तुषार म्हात्रे तसेच पळस्पे फाटा चेक पोस्टवरील एसएसटी पथकाचे प्रमुख किरण पोकळे, कामोठे पोलीस स्टेशन ठाण्याचे पोलीस शिपाई जितेश नवघरे, तळोजा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रकाश म्हस्के, खारघर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई हौसराव खकाळ उपस्थित होते. 

Web Title: Panvel Crime News: Six lakh cash seized at Palaspe check post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.