पनवेल-रोहा ‘मेमू’ आजपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:02 AM2019-01-19T06:02:07+5:302019-01-19T06:02:09+5:30

पुणे-कर्जत पॅसेंजरही पनवेलपर्यंत : मध्य रेल्वेवरील पहिल्या राजधानीला हिरवा झेंडा

Panvel-Roha 'MEMU' will run from today | पनवेल-रोहा ‘मेमू’ आजपासून धावणार

पनवेल-रोहा ‘मेमू’ आजपासून धावणार

Next

मुंबई : मध्य रेल्वेवरून हजरत निजामुद्दीनपर्यंत (दिल्ली) धावणाऱ्या पहिल्या राजधानी एक्स्प्रेसला शनिवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. पनवेलहून पेणपर्यंत जाणाºया मेमूचा रोह्यापर्यंत विस्तार, पुणे-कर्जत पॅसेंजर पनवेलपर्यंत वाढवण्यासह अन्य प्रकल्पांचे लोकार्पणही या सोहळ््यात होईल.


मध्य रेल्वे मार्गावरील पेण-रोहादरम्यानच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. शिवाय रोहा, पेण, आपटा स्थानके, पश्चिम रेल्वेजवळील जगजीवन राम रुग्णालय, दादर फलाट क्रमांक पाच, खार रोड येथे सौरऊर्जा सुविधा उभारण्यात येणार आहेत. बेलापूर, तळोजा, बोरीवली, प्रभादेवी, माटुंगा रोड, जोगेश्वरी, गोेरेगाव, विरार, मालाड या स्थानकांतील पादचारी पूलाचे उद्घाटनही यावेळी करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील काही स्थानकांवर एटीव्हीएम मशीनची सुविधा, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, बोरीवली येथे लिफ्ट सुविधा, चुनाभट्टी आणि किंग्ज सर्कल या स्थानकांतील सुधारणांचेही याच सोहळ््यात लोकार्पण होईल. सीएसएमटी स्थानकात दुपारी पावणेदोनला होणाºया सोहळ््यात विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.


पुणे-पनवेल पॅसेंजर
पुणे- कर्जत पॅसेंजर यापुढे पनवेलपर्यंत धावेल. पुण्याहून ११ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी ५१३१८ क्रमांकाची गाडी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी सुटेल. ती कर्जतला दुपारी २ वाजून १५ मिनिटाऐवजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. पुढे पनवेलला दुपारी १ वाजून ४५ मिनिटांला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ती गाडी ५१३१७ या क्रमांकाने पनवेलहून दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी सुटून कर्जतला दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. कर्जत-पुणे दरम्यान परतीच्या प्रवासात या गाडीच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही. तसेच पुणे-कर्जतदरम्यानच्या थांब्यातही कोणताही बदल नाही. कर्जत-पनवेलदरम्यान ही गाडी चौक, मोहोपे, चिखले येथे थांबेल. या गाडीला १० सामान्य द्वितीय श्रेणी बोगी आणि दोन लगेज बोगी असतील.

राजधानीचे बुकिंग पाच तासांत फुल्ल
सीएसएमटी (मुंबई) - हजरत निजामुद्दीन (दिल्ली) राजधानी एक्सप्रेसचे बुकिंग अवघ्या पाच तासात फुल्ल झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १८ येथून शनिवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी फुलांनी सजवलेली ही गाडी रवाना होईल. गाडीत ७५६ आसन क्षमता आहे.
पनवेलला सरकते जिने : पनवेल स्थानकात १.६० कोटी खर्च करून बसवलेल्या सरकत्या जिन्याचे यावेळी उद्घाटन होईल. ५९ सरकत्या जिन्यांचे काम सुरू असून यापैकी ४३ मध्य रेल्वे मार्गावर आणि १६ पश्चिम रेल्वे मार्गावर उभारले जाणार आहेत.

रोहा, पेण, आपटा ‘ग्रीन स्टेशन’
रोहा, पेण, आपटा ही स्थानके ग्रीन स्टेशन असतील. तेथे सर्व दिवे एलएडी असतील. ते सौरऊर्जेवर चालतील. यापूर्वी आसनगाव स्थानक ग्रीन स्थानक झाले आहे.

आणखी ४० एटीव्हीएम
मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकावर ४० आणखी एटीव्हीएम मशीन लावण्यात येणार आहेत. दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण स्थानकांत सुधारणा करण्यात येणार आहे. त्यावर एक कोटी खर्च करण्यात येणार आहेत. तसेच घाटकोपर स्थानकात एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत.

Web Title: Panvel-Roha 'MEMU' will run from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.