आदिवासींचा पनवेल तहसीलवर मोर्चा
By admin | Published: July 19, 2016 02:22 AM2016-07-19T02:22:32+5:302016-07-19T02:22:32+5:30
पनवेल तालुक्यातील आदिवासी व मागासवर्गीयांच्या मागण्या अनेकदा अर्ज विनंत्या, निवेदने करून देखील सुटत नाहीत.
खालापूर : खोपोली नगर परिषदेने ठराव करूनही अनुकंपातत्त्वावरील नियुक्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. या नियुक्त्या होत नसल्याने बेरोजगार युवक हतबल झाले आहेत. त्यामुळे या नियुक्ता न झाल्यास १५ आॅगस्टनंतर आपण आमरण उपोषण करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा गरजू बेरोजगारांनी दिला आहे.
खोपोली नगरपालिकेच्या प्रशासनाने या प्रकरणी सतत दुर्लक्ष केल्याने अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळेल, अशा अपेक्षेत असलेले अनेक तरुण सध्या निराश झाले असून, पालिकेच्या कारभाराचा सर्वत्र निषेध केला जात आहे. नगर परिषदेने अनुकंपा तत्त्वावर भरावयाच्या जागांसाठी उमेदवारांची सूची केली आहे. या जागा भरण्याबाबत ठराव केले आहेत, सातत्याने जुने कर्मचारी निवृत्त होत असल्याने जागा भरल्या जात नाहीत आणि अनुकंपा तत्त्वावर भरती करण्याचे गाजर दाखवून गरजूंची क्रूर चेष्टा केली जात आहे. वर्षोनुवर्षे हा प्रकार सुरू असून, बेरोजगार तरुणांचे वय वाढत असल्याने पुन्हा नोकरीत समाविष्ट होताना वयाबाबत अडचणी येण्याची शक्यता आहे. वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हलाखीमुळे आपल्यापुढे आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेवटचा मार्ग म्हणून १५ आॅगस्टनंतर आपण उपोषणास बसणार असल्याचे गरजूंनी स्पष्ट केले असून, तसे निवेदन रायगडच्या जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
खोपोली नगरपालिकेतून सेवा निवृत्त होणाऱ्या कामगारांच्या रिक्त झालेल्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्यांच्याच कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याची तरतूद असताना खोपोलीत मात्र गेली अनेक वर्षे अनुकंपा तत्त्वावर नोकर भरतीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे नोकरीच्या अपेक्षेत असलेले अनेक बेरोजगार तरुण निराश झाले आहेत.
शेवटचा प्रयत्न म्हणून या तरुणांनी १५ आॅगस्टनंतर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वास राजाराम फावडे, संतोष दिलीप मंडळे, विशाल अरुण शिंदे, दत्तात्रेय शिवशरण मिनचंद, प्रसाद रघुनाथ केदारी, परशुराम गणपत ढुमणे, शैलेश अशोक शेळके व अन्य तरुणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, १५ आॅगस्टपूर्वी योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी तरुणांनी केली आहे.
अनुकंपा तत्त्वावर पहिल्या टप्प्यात सात कर्मचारी घ्यायचे आहेत. तसा प्रस्ताव आम्ही ठराव करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. ज्या ठिकाणी हा प्रस्ताव प्रलंबित आहे, त्या ठिकाणी सध्या कुणीही अधिकारी नाही. त्यामुळे वेळ होत असून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर नियमात बसतील अशांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेतले जाणार आहे.
- डॉ. दीपक सावंत,
मुख्याधिकारी खोपोली