पनवेलचे ‘कलिंगड’राज संपुष्टात
By admin | Published: May 4, 2017 06:09 AM2017-05-04T06:09:33+5:302017-05-04T06:09:33+5:30
सुमारे ४० वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग ४वर खांदा वसाहतीजवळील रस्त्याच्या कडेला अगदी थाटात वसलेले पनवेलमधील कलिंगडराज
वैभव गायकर / पनवेल
सुमारे ४० वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग ४वर खांदा वसाहतीजवळील रस्त्याच्या कडेला अगदी थाटात वसलेले पनवेलमधील कलिंगडराज संपुष्टात आले. महामार्गाच्या रुं दीकरणात या कलिंगड विक्रे त्यांचा बळी गेला आहे. पावसाळ्याचे काही महिने सोडले, तर वर्षभर सुरू असलेल्या या विक्रेत्यांचा व्यवसायच डबघाईला आला आहे. सुमारे ६० ते ७० कलिंगड विक्रे त्यांचे कुटुंब येथील व्यवसायावर अवलंबून होते. याठिकाणाहून ये-जा करणारे हजारो वाहनचालक आपली तृष्णा भागविण्यासाठी या ठिकाणी आवर्जून थांबत असत. मात्र, येथील कलिंगडाचे राज आता संपुष्टात आले आहे.
यापूर्वी जुना मुंबई-पुणे महामार्ग याच ठिकाणाहून जात होता. त्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर त्याकाळी या विके्र त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. निम्म्यापेक्षा जास्त गाड्या या द्रुतगती महामार्गाने जात असल्याने या विक्रे त्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला होता. मात्र, कालांतराने पुन्हा एकदा धंद्यावर चांगली वचक बसली. मात्र, कळंबोली ते पळस्पे या मार्गाच्या रुं दीकरणात या व्यावसायिकांचा बळी गेला. तालुक्यातील खुटारी, तळोजा, नितळस आदी ठिकाणचे हे व्यावसायिक आहेत. जवळजवळ ४० वर्षे हा व्यवसाय दिमाखात सुरू होता. कर्नाटक, राजस्थान, तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतील कलिंगड याठिकाणी विक्र ीसाठी ठेवले जात असत. हा व्यवसाय जरी अनधिकृत जागेवर असला तरी याबाबत कोणाचीच तक्र ार नसायची. ये-जा करणाऱ्या वाटसरूंची प्रचंड उकाड्यात तहान भागवणाऱ्या कलिंगडाच्या खापा खाण्याचा मोह याठिकाणाहून जाणाऱ्या कोणालाच आवरता आला नाही, हे तेवढेच सत्य आहे. त्यामुळेच याबाबत कोणीच तक्रार केली नाही. सात महिन्यांपूर्वी पनवेल महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी याबाबत धडक मोहीम राबवत या व्यावसायिकांवर कारवाई केली. या विक्रेत्यांचा व्यवसाय वाचविण्यासाठी काही राजकीय मंडळीही पुढे सरसावली होती. मात्र, आयुक्त शिंदे यांच्यापुढे कोणाचेच चालले नाही. या कारवाईनंतर वर्षानुवर्षे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या विके्र त्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही कलिंगड विक्रेत्यांनी घाबरत याठिकाणी व्यवसाय थाटला आहे, तर काही विक्रेते फिरत्या पद्धतीने बैलगाडीच्या साहाय्याने खारघर, कळंबोली, कामोठे आदी ठिकाणी कलिंगड विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या ७०पेक्षा जास्त दुकानदारांच्या शेकडो व्यक्तींवर हा व्यवसाय बंद झाल्याचा परिणाम झाला आहे. आमचे व्यवसाय बंद करण्यापूर्वी प्रशासनाने आमचे या महामार्गावरच कुठेतरी पुनर्वसन करणे गरजेचे होते. हा व्यवसाय केवळ आमच्या फायद्यासाठी नसून ये-जा करणाऱ्या वाटसरूंचीही मोठी पंचाईत झाली आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
- उमेश पाटील,
कलिंगड विक्रेता