पेपरफुटीवर शिक्कामोर्तब; यवतमाळ जि. प.तील भरती परीक्षा रद्द

By Admin | Published: November 5, 2014 12:57 AM2014-11-05T00:57:49+5:302014-11-05T00:57:49+5:30

जिल्हा परिषदेतील पदभरती घोटाळ्यातील पेपरफुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तारतंत्री या चार

Paperfight; Yavatmal district Recruitment Examination canceled | पेपरफुटीवर शिक्कामोर्तब; यवतमाळ जि. प.तील भरती परीक्षा रद्द

पेपरफुटीवर शिक्कामोर्तब; यवतमाळ जि. प.तील भरती परीक्षा रद्द

googlenewsNext

यवतमाळ : जिल्हा परिषदेतील पदभरती घोटाळ्यातील पेपरफुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तारतंत्री या चार संवर्गातील पदांसाठी घेतलेली लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी मंगळवारी घेतला.
दरम्यान, औरंगाबाद पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांची दुपारी तब्बल दीड तास चौकशी केली. पेपरफूटप्रकरणी जिल्हाधिकारी महिवाल यांनी परीक्षा रद्द केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यवतमाळ जिल्हा परिषदेतील चार संवर्गासाठी २ नोव्हेंबरला लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा पेपर आपण स्वत: १ नोव्हेंबरला मध्यरात्री तयार केला. हा पेपर औरंगाबाद येथे फुटल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता फॅक्सद्वारे दिली. याप्रकरणी मंगळवार दि. ३ नोव्हेंबरला औरंगाबादचे पोलीस पथक यवतमाळात आले. त्यांनी आरोपींकडून जप्त केलेल्या उत्तरपत्रिकेची माहिती दिली. या प्रकरणासंदर्भात लेखी जबाबही घेतले. पोलिसांनी दिलेल्या उत्तरपत्रिकेशी विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता आणि तारतंत्री यांच्या उत्तरपत्रिका जुळत असल्याचे आढळून आले आहे. जिल्हा निवड समितीच्या उत्तरपत्रिकेसोबत आरोपींजवळची उत्तरपत्रिका ७० टक्के मिळतीजुळती असल्याचे आढळले आहे. मात्र पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेली मूळ उत्तरपत्रिका दिलेली नाही. त्याची प्रत द्यावी, अशी लेखी मागणी आपण दुसऱ्यांदा करणार आहे.
जिल्हा निवड समितीचा पेपर लिक झाल्याचे दिसून येते. जाहीर झालेल्या निकालामध्ये विस्तार अधिकारी संवर्गातील दोन विद्यार्थ्यांना २०० पैकी १६६ आणि १४२ असे गुण मिळाले आहेत. कनिष्ठ अभियंता या पदासाठी उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले ४५ टक्के म्हणजे २०० पैकी ९० गुणही कुणी घेतलेले नाही. यावरून नेमका पेपर फुटला की नाही असाही संभ्रम निर्माण होतो. मात्र उत्तरपत्रिका मिळतीजुळती असल्याने ही परीक्षा रद्द केली आहे. उर्वरित १० पदांसाठी असलेली परीक्षा ८ नोव्हेंबरपासून सुरळीत घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी महिवाल औरंगाबादमध्ये सीईओ असताना त्यांच्या संपर्कातील व्यक्तीने चुकीचा वापर केल्याची शक्यता आहे काय, असे विचारले असता याबाबत तपासणी केली जाईल, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड, प्रभारी माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते.

Web Title: Paperfight; Yavatmal district Recruitment Examination canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.