प. बंगालमध्ये दुपारी १ पर्यंत ५६ टक्के मतदान
By admin | Published: May 12, 2014 02:06 PM2014-05-12T14:06:45+5:302014-05-12T15:13:57+5:30
लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदानाला सोमवारी सुरूवात होताच बंगालच्या मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला.
Next
>ऑनलाइन टीम
कोलकाता, दि. १२ - लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदानाला सोमवारी सुरूवात होताच बंगालच्या मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. दुपारी १ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ५६ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.
पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तरप्रदेशातील राहिलेल्या काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यात आज मतदान होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातील मतदारांच्या तुलनेत पश्चिम बंगालमधील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. या ठिकाणी मतदारांनी मतदान केंद्रावर जावून आपला मतदानाचा अधिकार बजावला. दुपारी १ वाजेर्यंत पश्चिम बंगालमध्ये ४१ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला तर बिहारमध्ये ३८ टक्के आणि उत्तरप्रदेशात ३६ टक्के मतदारांनी मतदान केल्याची माहिती आहे.