प्राप्तिकर अधिका-याकडे कोट्यवधीचे घबाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:56 AM2017-07-29T04:56:07+5:302017-07-29T05:05:13+5:30

प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिका-यानेच कोट्यवधीचे घबाड लपवून ठेवल्याची खळबळजनक माहिती सीबीआयने शुक्रवारी दाखल केलेल्या गुन्ह्यातून समोर आली आहे

paraapataikara-adhaikaa-yaakadae-kaotayavadhaicae-ghabaada | प्राप्तिकर अधिका-याकडे कोट्यवधीचे घबाड

प्राप्तिकर अधिका-याकडे कोट्यवधीचे घबाड

Next

मुंबई : प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिका-यानेच कोट्यवधीचे घबाड लपवून ठेवल्याची खळबळजनक माहिती सीबीआयने शुक्रवारी दाखल केलेल्या गुन्ह्यातून समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई आयकर विभागातील टीडीएस विभागाचे अतिरिक्त आयुक्त विवेक बत्रा यांच्यासह पत्नी प्रियांका आणि अन्य तिघांवर सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. याच प्रकरणात सीबीआयने त्याच्या मुंबईसह ठाणे, गोवा, सिल्व्हासा आणि दिल्ली येथील १० ठिकाणांवरील घर, कार्यालयांवर छापे टाकले.
विवेक बत्रा हे १९९२ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ते सध्या आयकर विभागाच्या टीडीएसचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. कामाच्या कालावधीत त्यांनी बेनामी मालमत्ता बाळगल्याबाबत सीबीआयकडे तक्रार आली होती. १ एप्रिल २००८ ते ३० एप्रिल २०१७ दरम्यान त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केली. सीबीआयने अधिक चौकशी सुरू केली तेव्हा तपासात बत्रा यांच्या उत्पन्नापेक्षा बेनामी स्थावर तसेच जंगम मालमत्ता अधिक आढळून आली. ही मालमत्ता त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या नावावर आहे. त्यामुळे पत्नीही सहआरोपी आहे. बत्रा यांच्याकडे एकूण ६ कोटी ७९ लाख ५१ हजार ११६ रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आढळून आली. मात्र, एवढी मालमत्ता कशी व कोठून आली याबाबत ते स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यामुळे सीबीआयने बत्रा, त्यांच्या पत्नी प्रियांका, सीए शिरीष शहा, विराज प्रोफाइल लिमिटेडचे एमडी नीरज कुमार, अलोक इंडस्ट्रिजचे संचालक दिलीप जिवारजीका यांच्याविरुद्ध् बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

Web Title: paraapataikara-adhaikaa-yaakadae-kaotayavadhaicae-ghabaada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.