पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 06:09 AM2024-10-02T06:09:42+5:302024-10-02T06:09:58+5:30

विधानसभेच्या २०१९ च्या एडीआरचे विश्लेषण : २६४ आमदार आहेत करोडपती

Parag Shah owns 500 crores and Mangalprabhat Lodha owns 441 crores, Maharashtra MLA's net worth, property | पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी

पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी

- नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी केलेल्या विश्लेषणानुसार महाराष्ट्रातील २६४ आमदार करोडपती आहेत. यात सर्वाधिक संपत्ती भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांची ५०० कोटी तर त्याखालोखाल मलबार हिलचे भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांची ४४१ कोटींची संपत्ती आहे. 

डहाणूचे विनोद निकोलेंकडे अवघी ५१ हजारांची मालमत्ता
सर्वात गरीब आमदार डहाणूचे कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले हे असून त्यांची संपत्ती अवघी ५१ हजार आहे. त्या खालोखाल भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची मालमत्ता १० लाख आणि एमआयएमचे धुळ्याचे आमदार शाह फारूख अनवर यांनी २९ लाखांची मालमत्ता दर्शविली आहे. 

सर्वात कमी संपत्ती दर्शविलेले १० आमदार
आमदाराचे नाव (पक्ष)    शपथपत्रात 
        दर्शविलेली संपत्ती
विनोद निकोले (सीपीआय)    ५१ हजार
राम सातपुते (भाजप)    १० लाख
शाह फारूख अनवर (एमआयएम)    २९ लाख
देवेंद्र भुयार (स्वाभिमानी पक्ष)    २९ लाख
शांताराम मोरे (शिवसेना)    ३४ लाख
अदिती तटकरे (राष्ट्रवादी)    ३९ लाख
किरण लहामटे (राष्ट्रवादी)    ५२ लाख
मोहमद इस्माईल अब्दुल खालिके
(एमआयएम)    ५६ लाख
रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)    ६१ लाख
श्रीनिवास वनगा (शिवसेना)    ७२ लाख

Web Title: Parag Shah owns 500 crores and Mangalprabhat Lodha owns 441 crores, Maharashtra MLA's net worth, property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.