परांजपे बिल्डर गजाआड

By admin | Published: April 25, 2017 02:30 AM2017-04-25T02:30:36+5:302017-04-25T02:30:36+5:30

१८०० सर्वसामान्यांना स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून ४७ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी परांजपे कन्स्ट्र्क्शनच्या जयंत परांजपे यांना गजाआड

Paranjape Builder GazaAad | परांजपे बिल्डर गजाआड

परांजपे बिल्डर गजाआड

Next

वसई : १८०० सर्वसामान्यांना स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून ४७ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी परांजपे कन्स्ट्र्क्शनच्या जयंत परांजपे यांना गजाआड करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
१९८५ मध्ये परांजपे कन्स्ट्र्क्शनने विरारजवळील कोफराड येथे जेपीनगर नावाचा गृहप्रकल्प बांधला. त्यावेळी कोफराडचे तत्कालीन सरपंच मनवेल तुस्कानो यांनी तीव्र विरोध केला होता. या प्रकल्पाविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर, हा प्रकल्प रखडला होता. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली होती. ग्राहकांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर, काही भूखंडाचा लिलाव झाला, तर काही भूखंडावर सरकारने टाच आणली होती.
प्रकल्प रखडल्यानंतर आयोनिक इको सिटी संकुलात सात मजल्याच्या ३६ इमारती उभारण्याची जाहिरातबाजी केल्याचा परांजपे यांच्यावर आरोप करण्याता आला होता. या ठिकाणी स्वस्त दरात सदनिका दिल्या जातील, असे आमिष दाखवण्यात आले होते. त्यासाठी ग्राहकांकडून २० टक्के रक्कम आगाऊ घेण्यात आली होती. येथील सदनिकांचा ताबा २०१४ पर्यंत दिला जाईल, असेही आश्वासन बिल्डरने दिले होते.
त्याचप्रमाणे, गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या रकमेवर वार्षिक १५ टक्के व्याज देऊन रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते, तसेच १४०० ग्राहकांकडून सुमारे ३८ कोटींच्या ठेवी गोळा केल्या होत्या. यानंतर, हा संपूर्ण प्रकल्प परांजपे यांनी तारीक शौकतअली चुनावाला यांच्याशी करार करून त्यांना विकला होता.
प्रत्यक्षात परांजपे आणि चुनावाला यांनी प्रकल्प पूर्ण केला नाही, तसेच गुंतवणुकादारांचे पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे परांजपे यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून परांजपे यांच्याविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, पोलिसांनी जयंत परांजपे यांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Paranjape Builder GazaAad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.