परभणीचे विशाल सानप ‘ईडी’च्या अहमदाबाद विभागाचे सहसंचालक
By Admin | Published: November 7, 2016 06:29 AM2016-11-07T06:29:14+5:302016-11-07T06:29:14+5:30
सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) अहमदाबाद विभागाचे सहसंचालक म्हणून परभणी जिल्ह्यातील ३६ वर्षीय विशाल सानप यांची पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे
जमीर काझी, मुंबई
सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) अहमदाबाद विभागाचे सहसंचालक म्हणून परभणी जिल्ह्यातील ३६ वर्षीय विशाल सानप यांची पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदाबाद विभागाच्या कार्यक्षेत्रात गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांसह दीव व दमण या केंद्र शासित प्रदेशांचा समावेश होतो. त्याचे प्रभारी अधिकारी म्हणून विशाल सानप काम पाहतील.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्यांच्या बढतीचे आदेश नुकतेच काढले आहेत. मूळचे परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील शेवाडी गावाचे असलेले सानप हे सध्या ईडीच्या मुंबई परिमंडळामध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व त्यांच्या कुंटुंबीयांविरुद्धच्या प्रकरणाचा तपास त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरू आहे.
निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. माधवराव सानप यांचे पुत्र असलेले विशाल हे २००५ साली केंद्रीय स्पर्धा परीक्षा
उत्तीर्ण झाले असून, महसूल विभागात (आरआरएस) निवडले गेले.
त्यांनी पुणे विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी (बी.ई.) व एमबीए मार्केटिंगची पदवी घेतली असून केंद्रीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी गाझियाबाद
केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई
कस्टम, पुणे केंद्रीय अबकारी विभागात काम केले आहे. त्यानंतर त्यांची ईडीच्या मुंबई परिमंडळात उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली होती.