विधानसभा निवडणुकीत गाजतायत 'पार्सल' लढती !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 04:32 PM2019-10-13T16:32:38+5:302019-10-13T16:32:52+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांना बारामतीचे पार्सल म्हणून हिनवले. तसेच भाजप उमेदवार राम शिंदे यांना निवडून देऊन बारामतीचं पार्सल परत पाठवून द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले होते.

Parcels fight in Assembly elections Vidhan Sabha Election 2019 | विधानसभा निवडणुकीत गाजतायत 'पार्सल' लढती !

विधानसभा निवडणुकीत गाजतायत 'पार्सल' लढती !

Next

- रवींद्र देशमुख

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच जोर चढला आहे. तसाच जोर आता टीका टिप्पणी करण्यावरही वाढला आहे. प्राण्यांची उपाधी झाल्यानंतर आता वैयक्तीक टीका करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचवेळी मतदार संघ नसलेल्या पण जनतेतून निवडून येण्याची इच्छा बाळगून बाहेरच्या मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या नेत्यांवरही टीका होताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर हे बाहेरच पार्सल परत पाठवून द्या, असा सल्ला मतदारांना नेते मंडळीकडून देण्यात येत आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू रोहित पवार उभे असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातून पार्सल या टीकेला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांना बारामतीचे पार्सल म्हणून हिनवले. तसेच भाजप उमेदवार राम शिंदे यांना निवडून देऊन बारामतीचं पार्सल परत पाठवून द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. मात्र या मतदारसंघातून रोहित पवारांना मिळणारा पाठिंबा पाहता, पार्सल या शब्दामुळे त्यांच नुकसान होईल, असं चित्र सध्या तरी दिसत नाही.

कर्जत-जमाखेड व्यतिरिक्त बाहेरच पार्सल म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चांगलेच ट्रोल होत आहे. मुळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूड मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. कोथरूडमधील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आले आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये पार्सल लढत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांच्यावर होत आहे. परंतु, कोथरूड मतदार संघावर भाजपची पकड मजबूत असून पार्सलचा मुद्दा पाटील यांच्यासाठी फारसा महत्त्वाचा ठरणार नाही,  अशी शक्यता आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदार संघातील लढत देखील पार्सल लढत म्हणून गाजत आहे. घनसावंगी मतदार संघातून शिवसेनेकडून हिकमत उढाण तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश टोपे निवडणूक लढवत आहेत. उढाण हे अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास होते. मात्र मागील पाच वर्षांपासून ते मतदार संघात सक्रिय झाले आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र आता राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर मुंबईचं पार्सल अशी टीका करण्यात येते. परंतु, उढाण यांनी देखील आपण इथलच पार्सल असून येथेच राहणार अशल्याचे म्हटले आहे.

 

Web Title: Parcels fight in Assembly elections Vidhan Sabha Election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.